अनेक महत्वकांक्षी प्रकल्प पनवेल उरण परिसरात होऊ घातल्याने येथील जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. याचाच फायदा घेत  जागा मालक आणि विकासक यांच्याकडून कोट्यावधींची खंडणी उकळणारा विकी देशमुख याचा ताबा काही गुन्ह्यातील चौकशीसाठी नवी मुंबई गुन्हे शाखेने घेतला आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : एपीएमसीत गावठी संत्रा, मोसंबीची आवक कमी; दरात वाढ

विक्रांत दत्तात्रय देशमुख उर्फ विकी या नावाची दहशद पनवेल उरण परिसरात असून जमीन व्यवहारात दमदाटी करून मोठ्या प्रमाणात त्याने दहशद माजवली होती. याशिवाय हत्या, हत्येचा प्रयत्न बलात्कार अपहरण असे गंभीर गुन्हेही त्याच्या नावावर आहेत. सलग वर्षभर तत्कालीन गुन्हे शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे पोलीस निरीकक गिरीधर गोरे, शत्रुघ्न माळी यांच्या सह गुन्हे शाखेत काम करणारे ७० टक्के मनुष्यबळ याच्याच मागावर होते.

हेही वाचा- नवी मुंबई : मोकळ्या भूखंडावर राडारोडा, कचऱ्याचे साम्राज्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुलै महिन्यात त्याला गोव्यात अटक करून आणण्यात आले. आतापर्यंत त्याच्या टोळीतील १७ जणांना अटक केलेले आहे. यात १० पेक्षा अधिक त्याचेच जवळचे नातेवाईक आहेत. सध्या तो न्यायालयीन कोठडीत होता. मात्र खंडणी आणि हत्या प्रकरणातील चौकशी साठी त्याचा ताबा नवी मुंबई पोलिसांनी मिळवला आहे. गुरुवारी त्याला गुन्हे शाखेत आणले असून अजून ५ दिवस त्याचा मुक्काम याच ठिकाणी आहे. त्याच्या चौकशीतून खंडणी व इतर गुन्ह्यातील धागेदोरे हाती लागतील. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.