News Flash

मेंदूशी मैत्री : बुद्धिमत्तांच्या छटा

 ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या म्हणीप्रमाणे प्रत्येक जण वेगळा आहे. प्रत्येकाच्या डोक्यातल्या मेंदूची रचना एकसारखी असते.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. श्रुती पानसे

‘एफएमआरआय’सारख्या अतिप्रगत तंत्रज्ञानामुळे मेंदूच्या कोणत्या क्षेत्रात उद्दीपन होत आहे हे समजू शकतं. व्यक्तीला राग आला तर कोणता भाग उद्दीपीत होतो. बाळं पहिली भाषा शिकतात, तेव्हा कोणत्या भागात काम चालू असतं, अशा विविध गोष्टी संशोधकांना संगणकाच्या स्क्रीनवर प्रत्यक्ष बघता येतात. मेंदूच्या आत नक्की काय आहे, मेंदूचं काम कसं चालतं, मात्र आता त्या पुढचा पल्ला संशोधकांनी गाठला आहे. यामुळेच आता न्यूरो- एज्युकेशन, न्यूरो-सायकोलॉजी, न्यूरो-लिंग्विस्टिक्स असे अनेक नवीन शाखाविषय सुरू झाले आहेत. संशोधकांनी मेंदूत काय चाललंय, याचं चित्रण करणारी यंत्रणा तयार केली. त्या हालचालींचा अभ्यास सुरू झाला. अथक प्रयत्नांनी या हालचालींचा अर्थ लागायला सुरुवात झाली.

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या म्हणीप्रमाणे प्रत्येक जण वेगळा आहे. प्रत्येकाच्या डोक्यातल्या मेंदूची रचना एकसारखी असते. विविध क्षेत्रं ठरलेली असतात. त्यातली कामंही ठरलेली असतात.. मात्र त्यातल्या न्यूरॉन्स या पेशींनुसार फरक पडत जातो. या पेशींमुळे आपण इतरांपेक्षा वेगळे ठरतो.

अमेरिकेतील डॉ. हॉवर्ड गार्डनर हे प्रसिद्ध न्यूरो-सायंटिस्ट आहेत. त्यांनी अनेक मेंदूंवर संशोधन केलं. मेंदूत काय चालतं, याची अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने प्रत्यक्ष माहिती घेतली. त्यावरून ही गोष्ट लक्षात आली की, माणसाची अवघी बुद्धी ही त्याच्या न्यूरॉन्समध्ये साठवलेली असते.

प्रत्येकाच्या विविध क्षेत्रांमधल्या न्यूरॉन्सच्या गतीनुसार त्याची बुद्धिमत्ता ठरत असते. हे लक्षात आल्यावर ‘बुद्धी कमी की जास्त?’ हा प्रश्न सुटला. बुद्धी कमी किंवा जास्त, अशी समस्या नसते. तर एकाची बुद्धी काही विषयांत, तर दुसऱ्याची बुद्धी इतर काही विषयांत, असं असतं. हे निष्कर्ष सर्वाच्याच दृष्टीने महत्त्वाचे आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी १९८३ साली एक पुस्तक लिहिलं. त्याचं नाव आहे – ‘फ्रेम्स ऑफ माइन्ड’. यात  ‘मल्टिपल इंटेलिजन्सेस’ हा सिद्धांत मांडला आहे. याला मराठीत ‘बुद्धिमत्तांचे बहुआयाम’ असं म्हणता येईल. कारण यात बुद्धीच्या विविध आयामांचा विचार केला आहे.  प्रत्येकाच्या बुद्धीची काय खासियत असते हे सांगितलं आहे. बुद्धिमत्ता एक नसते, तर अनेक असतात, असं समाजाला दिशादर्शक ठरेल असं महत्त्वाचं विधान त्यांनी केलं आहे.

contact@shrutipanse.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2019 12:11 am

Web Title: article on shades of intelligence
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : हुशार कोण?
2 कुतूहल : प्रश्न ढिगाऱ्याचा
3 बुद्धी ही अथांग
Just Now!
X