गोव्यामध्ये नारळ, सुपारी, फणस अशा झाडांखाली खाली पडलेल्या पानांचे आच्छादन करतात. त्याला साऊळ घालणे म्हणतात. शेतीमध्ये साऊळीला फार महत्त्व आहे. साधारणपणे शेतामधील पीक काढल्यावर उरणारा पालापाचोळा जाळून टाकतात. आम्ही फळझाडे लावली आहेत. त्या झाडांवरून पडणारी पिकलेली पाने आणि इतर कचरा आम्ही जाळून टाकत होतो. झाडांना वारंवार आळी करून रासायनिक खते घालत होतो. परंतु त्यामुळे फायदा न होता नारळ बारीक यायला लागले. मग माझ्या वाचनात फुकुओकाचे ‘वन स्ट्रॉ रिव्हॉल्यूशन’ हे पुस्तक आले. त्यानंतर रासायनिक खते घालणे बंद करून पालापाचोळा, नारळाच्या झावळ्या साळून त्यांची पाने झाडांच्या मुळात घालायला सुरुवात केली. या साऊळीवर पाण्याचा फवारा, ठिबक सिंचन चालू ठेवले. परिणामी नारळ पुन्हा मोठे येऊ लागले.
साऊळ घातल्यापासून दिसणारा पहिला फायदा म्हणजे पिकाला घातलेल्या पाण्याची उघडय़ावर वाफ होते तशी होत नाही. दुसरा फायदा म्हणजे साऊळ घातल्यावर दिलेल्या पहिल्या पाण्यानंतर दुसऱ्या वेळेपासून पाणी कमी लागते. एखादे वेळी वीज नसल्यास पाणी दिले नाही तरी चालते. तिसरा फायदा म्हणजे साऊळीमध्ये गांडुळे होतात. गांडुळांमुळे जमीन घट्ट होत नाही व गांडुळांच्या विष्ठेचे खत मिळते. याशिवाय पालापाचोळा कुजल्यावर त्याचे खत मिळते ते वेगळेच. साऊळ गाजरगवताची घातली तरी चालते. मात्र साऊळ कार्यरत राहण्यासाठी ती ओलसर राहणे महत्त्वाचे आहे. शेणखत किंवा लेंडीखतापेक्षाही साऊळीचे परिणाम चांगले मिळतात. घरची गुरे असल्यास शेणखत परवडते. विकतचे शेणखत परवडत नाही.
 साऊळीमुळे जमीन जिवंत राहते. जमिनीमध्ये सूक्ष्म जीवांचे प्रमाण वाढते. त्यामुळे पिकांना अनेक फायदे मिळतात.
वांगी, मिरची वगरे लावल्यावर केलेल्या सऱ्यांमध्ये नारळाच्या झावळ्या साळून मोकळ्या झालेल्या पानांची चांगली साऊळ होते. त्यामुळे पाणीही उशिरा दिले तर चालते आणि परिणाम चांगला दिसतो. अशा तऱ्हेने उसाच्या सरयांत उसाचे वाढे टाकून फवारा पद्धतीने पाणी दिले तर त्याचा जास्त चांगला परिणाम होईल. प्लॅस्टिक अंथरूनही साऊळ घालतात. परंतु पालापाचोळ्याचे ज्याप्रमाणे खत होते, तसे प्लॅस्टिकचे होत नाही.
अशोक जोशी (पुणे)    मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org    

आजचे महाराष्ट्रसारस्वत : ३ एप्रिल
१८८२ > ‘वीरधवल’ आणि ‘सोनेरी टोळी’ या कादंबऱ्या लिहिणारे द्वारकानाथ माधव पितळे  म्हणजेच ‘नाथमाधव’ यांचा जन्म. अवघ्या तेविसाव्या वर्षी झालेल्या अपघातामुळे ते लेखनाकडे वळले आणि २४ सामाजिक कादंबऱ्या, १२ ऐतिहासिक कादंबऱ्या, दहा नाटके, ‘बोधशतक’ व ‘रत्नाकर’ हे काव्यसंग्रह अशी त्यांची साहित्यसंपदा ४६वर्षांच्या आयुष्यात बहरली. नीतीइतकेच अनीतीचेही चित्रण त्यांनी केले.
१८९९ > ख्यातनाम पत्रकार, संपादक, लेखक पां. वा. गाडगीळ यांचा जन्म. अखंड वाचन आणि चिंतन, विविध विषयांवर लेखन, अशी त्यांची कारकीर्द होती. ‘तिसऱ्या महायुद्धाची पाश्र्वभूमी’, ‘भारत-चीन संघर्षांचे स्वरूप’, ‘रशियन राज्यक्रांती’ अशी माहितीपर/ वैचारिक पुस्तके तसेच ‘गीता तत्त्वमंजिरी’ हे चिंतन, ‘खग्रास प्रभाकर’ ही कादंबरी आदी २० पुस्तके त्यांनी लिहिली.
१९२७ > डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बहिष्कृत भारत’ या पाक्षिकाचा नमुना अंक या दिवशी बाहेर पडला.
१९८५ > प्राच्यविद्या संशोधक, नाणकशास्त्राचे व्यासंगी डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचे निधन. जवळपास ४०० हून अधिक संशोधनलेख त्यांनी लिहिले होते, त्यापैकी काहींची पुस्तके झाली.
संजय वझरेकर

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
Holi 2024, Natural Colors, Children, Celebrate, Harmful Chemicals, parents, caring tips, skin, eye, infection,
होळीतील रासायनिक रंगाने डोळे, त्वचेच्या आजाराचा धोका! मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज

वॉर अँड पीस : दातांचे विकार : उपचार भाग-२
१) हलणाऱ्या दातांकरिता- स्वस्तिक दंतमंजनाने रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर व दुपारी जेवणानंतर दात अवश्य घासावेत. खैर, बकुळ, जांभूळ, हळद, बाभूळ, कडुनिंब यांच्या अंतर्सालीच्या चूर्णाच्या मंजनाने दात बळकट होतात. तुरटीच्या वापराने दात आवळले जातात, पण त्याचा अतिरेकी वापर करू नये. तीळ चावून खाल्यास दात बळकट व मजबूत होतात.
२) दात किडणे, ठणकणे- मयूर दंतमंजन अगदी चिमूटभर किडक्या दातांकरिता उपयुक्त आहे. आघाडा, बाभूळशेंग पावडर, लवंग, कडुनिंबसाल, करंजसाल, कापूर, चिरफळ, गूळवेल यांच्या चूर्णाचे मंजन, दातांतील कीड दूर करते. तसेच इरिमेदादि तेल वापरावे. रिंगणीच्या बोंडाच्या बियांची धुरी किडक्या दाताला लागू द्यावी. लाळ गाळावी. ठणका थांबतो. रिंगणीचे मूळ उगाळून, ठणकणाऱ्या दातांच्या फटीत ते गंध भरावे. असे ३-४ वेळा करावे.
३) दातांतून रक्त येणे- गेरूची पावडर दातांतील रक्त थांबवण्यास सर्वात चांगले औषध आहे. तुरट रसाच्या सर्व वृक्षांच्या आतल्या साली उदा., वड, उंबर, आंबा, जांभूळ, खैर, बकुळ, बाभूळ यांचा दातांतील रक्त थांबवण्याकरिता उपयोग होतो.
४) दातांवरील किटण- याकरिता तुरटी, गेरू, कडुनिंब, हळद व सैंधव (अपवाद म्हणून) व तुरट रसांच्या साली व त्रिफळाचूर्ण असे मिश्रण दातांवरील किटण काढण्याकरिता वापरावे. नवीन किटण चढू नये याकरिता भरपूर चुळा भराव्यात.
५) दातांची सूज- दातांच्या सूजेकरिता सूज असेपर्यंतच तुत्थ हरितकी किंवा बालहरितकी दोन दोन गोळय़ा घ्याव्यात. सूज कमी झाल्यास लगेच गोळय़ा थांबवाव्यात.
६) हिरडय़ांचे विकार- हिरडय़ांमधून पू येणे थांबवण्याकरिता कापूर व कात यांच्या मिश्रणाने हलक्या हाताने हिरडय़ांना मसाज करावा. हिरडय़ांमधून रक्त येत असल्यास इरिमेदादि तेलाने हलक्या हाताने हिरडय़ांना मसाज करावा. हिरडय़ा फुलल्या असल्यास खाणेही शक्य नसल्यास चांगल्या तुपाच्या खळखळून गुळण्या कराव्यात.
 वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. : वनवास
शनी माहात्म्यातल्या गोष्टीत विक्रम नावाचा राजा शनिदेवाचा अपमान करतो तेव्हा शनी विक्रमाला भेटायला येतो आणि त्याला एक उत्तम घोडा देतो, अशी कथा आहे. विक्रम हुरळतो, शनी नमला अशी समजूत करून घेतो आणि खोगीर न लावताच घोडय़ावर स्वार होतो न् होतो तच घोडा उधळतो आणि विक्रमाला त्याच्या राज्याच्या पार पलीकडे नेऊन फेकून देतो आणि पळून जातो. हा सत्ताहीन राजा मी राजा आहे, असे म्हणत सैरावैरा फिरतो पण कोणी ऐकत नाही. तेव्हा दमूनथकून त्याला एका सावकाराच्या घराच्या ओटय़ावर झोप लागते. सकाळी विचारपूस होते तेव्हा सावकार त्याला आपल्या घरात नोकर म्हणून ठेवतो. विक्रम चांगला वागतो. राजबिंडा असतो, तेव्हा सावकार एवढा खूश होतो की, दागिन्यांनी मढवलेली आपली मुलगी विक्रमच्या खोलीत लग्नाची बोलणी करायला धाडतो. विक्रम नाही म्हणतो. दागिन्यांनी मढवलेली मुलगी मग त्याच खोलीत झोपी जाते. त्या खोलीतल्या एका चित्रातला एक पक्षी जिवंत होतो आणि तो त्या मुलीच्या गळ्यातला एक सगळ्यात मौल्यवान दागिना गिळतो आणि परत चित्रात जाऊन बसतो. सकाळी ही मुलगी विक्रमवर आळ घेते आणि मग तो सावकार विक्रमला त्याचे हात-पाय कापून गावाबाहेर फेकून देतो. पुढे शनिदेव विक्रमाला माफ करतो आणि त्याचे हातपाय परत उगवतात अशी कथा आहे.
 ही कथा मी हल्ली हल्ली वाचली आणि मी माझ्या पहिल्याच नोकरीत लांडीलबाडी करताना कसा पकडला गेलो याची आठवण झाली. लांडीलबाडी सगळेच करीत होते, पण मी पकडला गेलो होतो हे सत्य होते आणि यातूनच मला वनवास घडणार होता. तो घडलाच. जे कणभर अस्तित्व होते ते हिरावले गेले आणि जे मिणमिणते तेज होते ते तर गेलेच, पण उरली फक्त बदनामीची काजळी. माझे आयुष्य ते केवढे आणि असे काय फार घडले होते? अशा अब्जावधी घटना जगाच्या इतिहासात घडल्या असणार. मी तर यत्किंचितच होतो. हे विश्वची माझे घर हे म्हणणे ठीक असेलही; परंतु शेवटी माणसाचे विशेषत: तरुण माणसांचे मनच त्यांचे घर असते. मी पुरता मोडीत निघायचाच राहिलो होतो.
ज्ञानेश्वरांनी याचे वर्णन केले आहे. ओव्या म्हणतात :
तेव्हा त्या पुरुषाचे। ते पुरुषत्व। जेव्हा प्रकृतीत होते स्थित।
तेव्हा जणु चंद्र लपतो । अमावस्येत।।
चोख सोने झाले हिंणकस। पिशाच्चाने झपाटला सज्जन।
आकाशात यावे आभाळ। तसे।।
परतंत्र राजा। निस्तेज सत्ताहीन। रोगाने जर्जर । सिंह।।
मी राजा सिंह चंद्र वगैरे काही नव्हतो पण एक जीव होतो नक्कीच. माझ्या येणाऱ्या वनवासात मला एक गुरू भेटायचे होते त्याबद्दल पुढच्या लेखात.
रविन मायदेव थत्ते –  rlthatte@gmail.com