वोडीयार घराण्याची सत्ता म्हैसूर राज्यात इ.स. १३९९ ते १९४७ अशी झाली. मध्यंतरी १७६० ते १७९९ अशी ३९ वष्रे मात्र वोडीयार राजे हे नाममात्र राज्यकत्रे बनून राहिले. या काळात प्रथम हैदरअली हा दलवाई म्हणजे सेनापती आणि नंतर त्याचा मुलगा टिपू हेच प्रत्यक्षात राज्याचा कारभार करीत असत. चिक्कादेवराजाने सुरू केलेले ‘अट्टारा कचेरी’ म्हणजे अठरा विभागांचे मंत्रालय ही व्यवस्था हैदरने चालू ठेवली. हैदरने गोवळकोंडय़ाच्या निजामावर केलेल्या आक्रमणातून निजाम राज्यात यथेच्छ लूट केली. निजामाच्या खजिन्यातून मिळालेल्या अमाप सोन्याच्या नाण्यांमुळे हैदरच्या राज्याची आíथक परिस्थिती उत्तम झाली. या धनाचा उपयोग त्याने त्याच्या सन्याच्या आधुनिकीकरणासाठी केला. त्यासाठी त्याने फ्रेंच युद्धतज्ज्ञांची मदत घेतली. राज्याचे पाच सुभे (असोफी) आणि १७१ तालुके (परगाणे) पाडून प्रशासकीय व्यवस्था लावली. अत्यंत आक्रमक, स्वाभिमानी स्वभावाचा हैदर छापे टाकणे, केलेला तह-करार न पाळणे याबाबत प्रसिद्ध होता. हैदरच्या म्हैसूर फौजेची ब्रिटिशांबरोबर १७६७ ते १७९९ या काळात चार युद्धे झाली. पहिल्या युद्धात म्हैसूरची निजामाबरोबर तर ब्रिटिशांची मराठय़ांबरोबर युती होती. ब्रिटिशांची या युद्धात सरशी झाली. दुसरे युद्ध काही निर्णय न होता मंगलोर येथील तहाने समाप्त झाले. या युद्धकाळात १७८२ साली हैदरचा कर्करोगाने मृत्यू झाला. तिसऱ्या आणि चौथ्या ब्रिटिश-म्हैसूर युद्धातही म्हैसूरने सपाटून मार खाल्ला. हैदरअलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू याने या दोन युद्धांमध्ये म्हैसूरचे नेतृत्व केले. चौथ्या युद्धात ब्रिटिश, मराठे आणि निजाम यांच्या संयुक्त फौजेने श्रीरंगपट्टणम् येथील युद्धात टिपूच्या फौजेचा निर्णायक पराभव केला. त्यामध्ये टिपू मारला गेला.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल – हे सुरांनो, चंद्र व्हा!
‘युरेका.. युरेका’ हे शब्द महान शास्त्रज्ञ आर्किमीडीजला फार मोठा आनंद देऊन गेले असणार. काही नावीन्यपूर्ण, अनोखं, जगावेगळं जेव्हा सापडतं तेव्हा मनास असाच अपार आनंद होतो, अगदी गगनात न मावणारा. अशी ही ‘क्रिएटिव्हिटी म्हणजेच सर्जनशीलता’ सर्वानाच भावणारी, वेगळेपणाचा अनुभव देणारी. तसं म्हटलं तर ही सर्वच क्षेत्रांत आवश्यक असते.
वस्त्रोद्योग क्षेत्रात डिझायनर्स, स्टायलिस्ट, शिंपी हे अशा वेगळेपणाची अनुभूती देतात आणि त्यांना वस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्यातील डिझायनर्स आपल्या नवनवीन वस्त्रनिर्मितीद्वारे साथ देत असतात. येथे येणारा नावीन्यतेचा अनुभव हा उठून दिसणारा असतो. आपली उत्पादने ही नवीनतेची कास धरणाऱ्या डिझायनर्सच्या, तयार कपडेनिर्मिती करणाऱ्या नावाजलेल्या ब्रँड्सना वितरित व्हावीत हे वस्त्रनिर्मात्याचं स्वप्न असतं.
सर्जनशीलता ही कमीअधिक प्रमाणात सर्वामध्ये असते. निर्मिती क्षेत्रापासून ते कार्यालयीन कामकाज करणाऱ्या सर्व विभागांत म्हणजेच संपूर्ण आस्थापनातील कार्यरत सर्व स्तरांतील व्यक्तींमध्ये ती आढळते. निर्मिती प्रक्रिया उत्तमोत्तम कशी करावी, कार्यालयीन सुसूत्रता आणि कार्यक्षमता कशी वाढवावी, प्रत्येक विभागात काम करणाऱ्यांचे आपसातील संपर्क, विभागा-विभागांतील संवाद आणि बाहेरच्या जगाशी संपर्क जास्त प्रभावी कसे करावे, अहवालामधील स्वरूपामध्ये काही बदल हवेत का इत्यादी अनेक विषयांवर, अनेक विभागांतून सूचना येऊ शकतात. अशा सूचना मनात येणाऱ्या सर्वानाच त्या योग्य स्तरांत कळविण्याचा आत्मविश्वास असतोच असे नाही. तसेच बऱ्याच वेळा अशा सूचनांना योग्य दाद मिळतेच असे नाही. अशा प्रकारच्या ‘सर्जनशील’ कल्पनांना दाद देणारी वातावरणनिर्मिती खूप महत्त्वपूर्ण वाटते. याला वाव मिळणारं पोषक वातावरण निर्माण करणं, रुजवणं, वाढवणं नव्या युगात खूप आवश्यक आहे आणि यासाठी वरिष्ठ व्यवस्थापनात स्वत: लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. डिझायिनग, विपणन याबरोबरच वस्त्रनिर्मिती, विविध प्रशासकीय विभाग, विक्री साखळीतील भागीदार इत्यादी सर्व विभागांच्या सर्जनशील सहकार्याची परिणती वस्त्रनिर्मात्यांची ब्रँड इमेज प्रभावी बनण्यात होईल आणि ब्रँड मेसेजचा सूर ग्राहकदेवतेस समíपत होताना म्हणेल, ‘हे सुरांनो, चंद्र व्हा’!
सुनील गणपुले (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?
Sudhir Singh murder case
सुधीर सिंग हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अटक, उत्तर प्रदेशच्या जंगलात पेल्हार पोलिसांचा थरारक पाठलाग
Accused who absconded after killing from Bihar state arrested by Naigaon police vasai
बिहार राज्यातून हत्या करून फरार झालेला आरोपी नायगाव पोलिसांच्या जाळ्यात
sangli lok sabha marathi news, mla vinay kore marathi news
सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाला मित्र पक्षाकडून आव्हान