आठवडय़ाची मुलाखत : शलभ गोयल, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक

मुंबई उपनगरी रेल्वेसमोर वाढत्या प्रवासी संख्येचे आव्हान नेहमीच मोठे राहिले आहे. प्रवाशांच्या वाढत्या गरजांनुसार लोकलची सुविधा उपलब्ध करून देतानाच गर्दी नियंत्रणासाठी तसेच योग्य व्यवस्थापनासाठी स्थानकांत अन्य सुविधाही वाढवणे आवश्यक आहे. मध्य रेल्वेसमोर सध्या उभी असलेली आव्हाने आणि भविष्यातील प्रवासीसंख्येचा विचार करून करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांच्याशी साधलेला संवाद ..

’ मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवासी संख्या वाढत आहे. वाढती संख्या पाहता प्रवास सुकर कसा करणार?

उपनगरीय रेल्वे प्रवाशांची जरी संख्या वाढत असली तरी त्यानुसार सोयीसुविधांचीही भर पडत आहे. त्यासाठी मध्य रेल्वेकडूनही योग्य नियोजनही के ले जात आहे. वाढती प्रवासी संख्या पाहता लोकल गाडय़ांची आणि फे ऱ्यांचीही संख्या वाढवण्यात आली. सध्या दररोज १७०० हून अधिक लोकल फे ऱ्या होतात. तसेच बारा डब्यांऐवजी दोन पंधरा डब्यांच्या लोकलही चालवण्यात आल्या. पंधरा डब्यांच्या लोकलची संख्या वाढवणे, फे ऱ्या वाढवणे यासाठी काही महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. ते पूर्ण करण्यासाठी आणखी काही मार्गिका उपलब्ध झाल्या पाहिजे आणि त्यासाठीच प्रयत्न के ले जात आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मदतीने ठाणे ते दिवा पाचवा व सहावा मार्ग के ला जात असून त्याच्या कामांना वेग आला आहे. हा मार्ग पूर्ण होताच मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल. शिवाय लोकलचा प्रवासही सुकर होण्यास मदत होणार आहे. दिवा, कळवासह अन्य फाटकही बंद करून उड्डाणपूल के ले जात आहेत. जेणेकरून लोकलचे वेळापत्रक सुरळीत सुरू राहील. तसेच स्थानकात प्रवाशांसाठी सरकते जिने, उद्वाहक बसविले असून त्यांची संख्याही हळूहळू वाढवली जात आहे.

’ ठाणे-दिवा पाचवा-सहावा मार्ग, कल्याण ते बदलापूर, टिटवाळा तिसरी व चौथी मार्गिका महत्त्वपूर्ण आहे. या मार्गिका अद्यापही का पूर्ण झाल्या नाहीत?

ठाणे ते दिवा पाचवा व सहावा मार्ग प्रकल्प मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मदतीने के ला जात आहे. त्याला गती दिली जात असून यामध्ये कळवा ते मुंब्रा उन्नत मार्गिकाही येते. हा प्रकल्प लवकरच पूर्ण के ला जाणार असून त्यामुळे प्रवाशांनाही दिलासा मिळेल. शिवाय कल्याण ते बदलापूर, टिटवाळा तिसरा ते चौथा मार्गही टप्प्याटप्यात पूर्ण के ला जाणार आहे. हे मार्ग पूर्ण होताच लोकल प्रवासाचे वेळापत्रक सुरळीत ठेवण्यास मदत होईल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाबरोबरच अन्य संस्थांनाही मध्य रेल्वेकडून सहकार्य के ले जात आहे.

’ पादचारी पूल तसेच अन्य रेल्वे उड्डाणपुलांची स्थिती काय?

– मध्य रेल्वेने आयआयटीच्या मदतीने मुंबई रेल्वे विभागाच्या हद्दीतील पादचारी पूल आणि उड्डाणपुलांची सुरक्षा तपासणी के ली. ८९ उड्डाणपूल, १९२ पादचारी पूल आणि २० ओव्हरहेड वायर बांधकामांचा (पाणी पाईप लाईन इत्यादी) यात समावेश आहे. ही तपासणी पूर्ण झाली असून यातील ५३ उड्डाणपूल, ७६ पादचारी पूल आणि १२ ओव्हरहेड वायर बांधकामाची नित्यक्र माने देखभाल-दुरुस्तीची गरज असल्याचे अहवालात नमूद के ले. त्यानुसार त्यांची देखभाल के ली जात आहे. तर उर्वरित पादचारी पूल, उड्डाणपूल व ओव्हरहेड वायर बांधकामांपैकी काही धोकादायक असल्याने ते बंद करण्यात आले, तसेच ते पाडून त्या ठिकाणी नवीन पादचारी पूल किं वा उड्डाणपूल उभारणी इत्यादी कामे के ली जात आहेत.

गर्दीच्या स्थानकांचा विकास करण्याचे नियोजन काय आहे?

गेल्या काही वर्षांत गर्दी वाढली, त्यानुसार सुविधांची मागणीही वाढली आणि या मागणीनुसार सुविधाही देण्यात येत आहेत. मध्य रेल्वे, भारतीय रेल्वे स्थानक पुनर्विकास महामंडळ आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून स्थानक विकास के ला जात असून मोठय़ा प्रमाणावर नियोजनही के ले आहे. स्थानक पुनर्विकास महामंडळातर्फे  पहिल्या टप्प्यात अकरा आणि दुसऱ्या टप्प्यात ६१ स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सीएसएमटी, दादर, ठाकु र्ली, लोकमान्य टिळक टर्मिनस, लोणावळासह राज्यातील अन्य स्थानके  आहेत. या स्थानकांचा पुनर्विकास मोठय़ा प्रमाणात के ला जाणार असून त्यासाठी निविदा प्रकिया राबवली जात आहे. स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये आगमन आणि निर्गमनाचे वेगळे विभाग करणे, स्थानक दिव्यांगाना वापरता येण्यासारखे करणे, प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध करून देणे, रेल मॉल, ऊर्जा बचत करणाऱ्या पर्यायांचा अवलंब करणे इत्यादींची भर पडेल. अन्य स्थानकातही आगमन, निर्गमन व्यवस्थेत सुधारणा के ली जाणार आहे. विमानतळावरील सुविधांसारखी भर त्यात पडेल. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडूनही दहा स्थानकात सुविधा देताना त्यात काही बदल के ले जातील. त्याची काही कामेही हाती घेतली आहेत. भांडुप, मुलुंड, डोंबिवली, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, जीटीबी नगर, नेरळ, शहाड, कसारा अशी दहा स्थानके  आहेत.

’ प्रत्येक वर्षी पावसाळ्यात रुळांवर पाणी साचून लोकल सेवा ठप्प होते..

पावसाळा सुरू होण्याआधी मध्य रेल्वे पालिकांच्या मदतीने विविध कामे हाती घेते. यात नालेसफाई मोठय़ा प्रमाणात केली जाते. तर रुळांची उंचीही काही प्रमाणात वाढवली जाते. रुळांच्या आजबाजूला असणारा कचरा उचलून नेण्यासाठी कचरा विशेष रेल्वेगाडीही (मक स्पेशल)चालवली जाते. शिवाय अधिक संख्येने आणि जास्त क्षमतेचे पंप मशीन लावून रुळांवरील पाण्याचा निचरा के ला जातो. जलमयमुक्त राहण्यासाठी रेल्वे स्थानिक पालिकांच्या मदतीने नेहमीच विविध उपाययोजना करते. त्याचाच भाग म्हणून आम्ही सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळच रुळाखालून ४१५ मीटर लांबीच्या पर्जन्यजलवाहिनीचे (मायक्रोटनेल)काम के ले आहे. त्यामुळे रुळावर पाणी जरी साचले, तरीही त्याचा त्वरित निचरा होण्यास मदत मिळेल. अशाच प्रकारचे काम सीएसएमटी ते मशीद रोड स्थानक, दादर ते परेल (हिंदमाता)दरम्यानही सुरू आहे. तर कुर्ला ते विद्याविहार, वडाळा ते रावळी जक्शन, पनवेल ते कर्जत, बदलापूर ते वांगणी, कु र्ला ते टिळकनगर दरम्यानही रुळाखाली नवीन नाले करण्यात आले आहे.