पालघरच्या महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण हरीश नागावकर व कार्यकारी अभियंता प्रताप मचिये या दोघांनाही एक लाख रुपयांची रोख रक्कम लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पालघर पथकाने रंगे हात पकडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका कनिष्ठ अधिकाऱ्यां विरुद्ध दोन-तीन तक्रारी महावितरण विभागात दाखल असून त्यावर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी या दोघांनीही तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याचे सांगत ही रक्कम तडजोडी नंतर दीड लाख करण्यात आली. यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाकडे तशी तक्रार केली. या तक्रारीची शहनिशा व पडताळणी झाल्यानंतर लाचलुचपत पालघर प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक नवनाथ जगताप व त्यांच्या पथकाने महावितरण कार्यालयात सापळा रचला. तडजोड केलेल्या रकमेपैकी एक लाख रुपये रोख रकमेची लाच घेताना आज संध्याकाळी पाच च्या दरम्यान दोघांनाही रंगेहात अटक केली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msedcl superintending engineer executive engineer caught red handed while taking bribe zws
First published on: 26-12-2022 at 21:46 IST