एका अवजड वाहनाने तीन बाइकस्वारांना धडक दिल्याने त्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी जवळील एशियन पेट्रोल पंपच्या मार्गिका बदलण्यासाठी असणाऱ्या मोकळ्या जागेत (मिडीयम कट) आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडला.
हेही वाचा – पालघरमधील दोन कारखाने आगीत खाक
हेही वाचा – डॉक्टर नसल्यामुळे माता, बाळाचा मृत्यू
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
चारोटी जवळ असणाऱ्या या अपघात प्रवण क्षेत्रात स्थानिक नागरिकांना मार्गिका बदलताना अनेकदा प्राणास मुकावे लागले आहे. या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.