
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या ‘भूल भुलैया २’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला असून बॉक्स ऑफिस कलेक्शन थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या चित्रपटाने वीकेंडला ५२कोटींची कमाई केली असून, हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
पहिल्या ‘भूल भुलैया’चा मुख्य अभिनेता अक्षय कुमारच्या जागी कार्तिक आर्यनचे या चित्रपटात पदार्पण झाले तेव्हा तो ही व्यक्तिरेखा नीट साकारू शकेल का असे वाटले होते. पण या अभिनेत्याने सगळ्यांनाच चुकीचे सिद्ध केले आणि चित्रपट हिट झाला.
कार्तिकसोबत कियारा अडवाणी देखील या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की ‘भूल भुलैया’ आणि ‘भूल भुलैया 2’ अनेक अभिनेत्रींनी नाकारले होते, त्यानंतर विद्या बालन आणि कियारा अडवाणी यांनी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार स्टारर ‘भूल भुलैया’ मधील ‘अवनी’ च्या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय बच्चनला पहिल्यांदा संपर्क साधण्यात आला होता, परंतु तिने हा चित्रपट नाकारला होता.
‘भूल भुलैया’ या चित्रपटात अमिषा पटेलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. अमिषा पटेलच्या आधी कतरिना कैफला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती, परंतु अभिनेत्रीने ती नाकारली. या चित्रपटात अमिषा पटेलने ‘राधा’ची भूमिका साकारली आहे.
एवढेच नाही तर ऐश्वर्या राय बच्चनने ‘अवनी’ची भूमिका नाकारली होती. त्यामुळे या भूमिकेसाठी निर्मात्यांनी राणी मुखर्जीला अप्रोच केले होते, मात्र राणी मुखर्जीनेही ही भूमिका नाकारली होती. मात्र, यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
सारा अली खानने एका मुलाखतीत कार्तिक आर्यनला तिचा क्रश असल्याचे सांगितले होते. ‘भूल भुलैया २’ या चित्रपटात कियारा अडवामीच्या आधी ही भूमिका सारा अली खानला ऑफर झाली होती. सारा अली खानकडे त्यावेळी हा चित्रपट करण्यासाठी वेळ नव्हता. कारण तिच्याकडे कोणत्याही तारखा नव्हत्या ज्यामध्ये ती हा चित्रपटासाठी शूट करू शकेल. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने हा चित्रपट नाकारला.
याशिवाय कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची जोडी ‘लव्ह आज कल’ या चित्रपटात बनली होती, जी प्रेक्षकांना फारशी आवडली नाही. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना प्रभावित करण्यात दोघेही यशस्वी ठरले नाहीत.
‘भूल भुलैया 2’ या चित्रपटासाठी सारा अली खाननंतर श्रद्धा कपूरला अप्रोच करण्यात आले होते, मात्र अभिनेत्रीच्या व्यस्त शेड्यूलमुळे तिने हा चित्रपट नाकारला होता. मग या चित्रपटात कियारा अडवाणीने उत्तमरित्या भूमिका साकारली आहे. हि भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. (all photo: instagram)