-
‘ठरलं तर मग’ मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी प्रमुख भूमिका साकारत आहे.
-
जुई साकारत असलेल्या सायलीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिला आहे.
-
तर, मालिकेत खलनायिकेची भूमिका अभिनेत्री केतकी पालव साकारत आहे. तिच्या पात्राचं नाव मालिकेत साक्षी शिखरे असं आहे.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेत ऑनस्क्रीन सायली आणि साक्षी शिखरे या दोघींमध्ये नेहमीच वाद होत असतात.
-
पण, ऑफस्क्रीन या दोघींमध्ये फारच सुंदर नातं आहे.
-
६. जुई गडकरीने, “ऑनस्क्रीन ती ( साक्षी शिखरे ) मला खूप त्रास देते पण, ऑफस्क्रीन ती माझं प्रेम आहे” अशी पोस्ट केतकी पालवसाठी शेअर केली आहे.
-
या फोटोंमध्ये जुई आणि केतकी या दोघींनीही जांभळ्या रंगाच्या साड्या नेसल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रींनी हा खास लूक मोनिका दबडेच्या डोहाळेजेवणाच्या निमित्ताने केला होता.
-
सायली आणि साक्षी शिखरे यांना एकत्र पाहून नेटकऱ्यांनी फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “आम्ही उगाच टीव्ही पाहून संताप व्यक्त करतो”, “ऑफस्क्रीन एकत्र किती गोड दिसता”, “मालिका पाहून आम्ही उगाच टेश्नन घेतो, तुम्ही दोघी मस्त एकत्र असता सुंदर फोटो” अशा प्रतिक्रिया युजर्सनी साक्षी आणि सायलीचे फोटो पाहून दिल्या आहेत.
-
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये जुई गडकरीसह अभिनेता अमित भानुशाली प्रमुख भूमिकेत झळकत आहे. ( फोटो सौजन्य : जुई गडकरी इन्स्टाग्राम )

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या