चंद्र षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे भ्रमण करीत आहे. तेव्हा मानसिक परिवर्तन करणे योग्य राहील. मनात उठलेले विचारांचे वादळ सध्या लांब ठेवणे हिताचे असेल. नोकरदार वर्गाला कामाचे वेळापत्रक ठरवून काम करावे लागेल. इथेसुद्धा मागेपुढे कालावधी झाल्यामुळे कामाची धावपळ होईल. त्यामुळे मानसिक तणाव न घेता काम करा. व्यवसायात नवीन काही गोष्टी करू नका, जसे चालले आहे तसेच चालू द्या. महत्त्वाचे निर्णय टाळा. प्रत्येक वेळी फायद्याचेच नियोजन करणे योग्य ठरणार नाही. तोटा होणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागेल. र्आिथकदृष्ट्या ओढाताण होणार नाही याचे भान ठेवा. अनावश्यक गोष्टींचा खर्च टाळा. राजकीय क्षेत्रात नवे पाऊल उचलू नका. कुटुंबातील सदस्यांशी बोलताना संयम बाळगा. मन स्थिर ठेवा. धार्मिक गोष्टीत रमा. प्रकृतीची काळजी घ्या. >> शुभ दिनांक : ३१, ४ >> महिलांसाठी : प्रयत्नांवर विश्वास ठेवा. पूर्वार्धात कामे उरकून घ्या. नियोजित गोष्टींचा क्रम बदलू नका. स्वतंत्र विचार करून सुरुवात करणे योग्य ठरेल. नोकरदार व्यक्तींना मागील कामाचा अनुभव उपयोगी पडेल. प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे चीज होईल. अधिकारप्राप्तीसाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज राहणार नाही. व्यवसायात चाललेली चालढकल कमी होईल. दिरंगाईने होणाऱ्या गोष्टी वेग घेऊ लागतील, तेव्हा आता वेळ वाया न घालवता कामे वेळेत पूर्ण करा. बौद्धिक क्षेत्रात असणाऱ्यांना कलाटणी मिळेल. छोट्या-मोठ्या गोष्टीतून नवीन काही शिकावयास मिळेल. र्आिथक कामकाजातील अडथळे दूर होतील. सामाजिक क्षेत्रात मोठे सहकार्य कराल. कुटुंबातील सदस्यांचा र्पांठबा राहील. आध्यात्मिक बाबतीत समाधानी राहाल. रोजच्या उशिरा असणाऱ्या जीवनशैलीत बदल करा. >> शुभ दिनांक : १, २ >> महिलांसाठी : इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. ग्रहांचा प्रवास गतिमान नसला तरी आशादायक असेल. बौद्धिक क्षेत्रातील शास्त्रीय व्यासंग चांगला राहील. लेखक साहित्य क्षेत्रात शुभ परिणाम जाणवू लागतील. कौशल्य उत्तम राहील. संघर्षदायक परिस्थिती कमी होईल. व्यापार-उद्योगात सुटकेचा नि:श्वास सुटेल. संभ्रमित अवस्था दूर ठेवून नियोजनात्मक गोष्टी केल्या तर अडचणींचा कालावधी जाणवणार नाही. व्यावसायिक मोह वाढला तरी तो गडबडीने वाढवू नका. पूर्वीपेक्षा आताची कार्यपद्धती बदललेली असेल. वेळेचा सुरेख संगम कसा साधला जाईल याचा अंदाज घ्या. र्आिथक आवक चांगली असेल. सार्वजनिक क्षेत्रात मित्रांमार्फत नवीन योजना अंमलात आणाल. घरगुती वातावरण उत्तम असेल. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल. शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहाल. >> शुभ दिनांक : ४, ५ >> महिलांसाठी : नवीन संधीचा उपयोग करून घ्या. मागील काही गोष्टींचा होणारा त्रास कमी होण्याच्या मार्गावर असेल. धाडसी व पराक्रमी वृत्ती राहील. कामातील परिश्रम व नियोजन यांची सांगड बऱ्यापैकी जमेल. त्याचे फळ उशिरा का होईना मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींनी सुचवलेल्या काही योजना अमलात आणाव्या लागतील. व्यापारी क्षेत्रात गिऱ्हाईकांची मने वळवण्यासाठी केलेल्या जाहिरातीचा उपयोग होईल. भागीदारी व्यावसायिकांना समजुतीने वाटचाल ठेवावी लागेल. कामकाजात वाढ होईल. र्आिथक मंदी कमी झाल्याचा आनंद मिळेल. राजकीय क्षेत्रात दोन शब्द कमी बोललेले चांगले राहील. रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्याकडून न होणाऱ्या कामासाठी मित्रांना आधीच हवाला देऊ नका. मुलांकडे स्वतङ्महून लक्ष देणे गरजेचे राहील. कुटुंबासमवेत मनोरंजन करण्याचा बेत आखाल. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. >> शुभ दिनांक : ३१, ६ >> महिलांसाठी : मनासारखी मजा करता येईल. कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय निर्णय घेणे योग्य नाही, याचा अनुभव तुम्हाला आला असेल. सध्या या परिस्थितीमध्ये बराच बदल झालेला दिसेल. नोकरीमधील महत्त्वाकांक्षा पूर्णत्वाला जातील. व्यवसायात वाढत असलेली आकांक्षा दुहेरी मार्गावर असेल. रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी हीच संधी आहे हे विसरू नका. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये वेळ घालवू नका. मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण चांगले राहील. बऱ्यापैकी र्आिथक चणचण कमी होईल. राजकीय क्षेत्रात अधिकारी व्यक्तींनी दिलेल्या सूचनांचे पालन करा. प्रतिष्ठा पणाला लावून कोणत्याही गोष्टी करण्याचा मोह टाळा. एकूणच सप्ताह प्रगतीचा राहील. नातेवाईकांशी कार्यक्रमानिमित्त भेट होईल. शारीरिकदृष्ट्या योगसाधनेला महत्त्व दिल्यास प्रकृती उत्तम राहील. शुभ दिनांक : ३१, १ महिलांसाठी : स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न. पूर्वार्धात चंद्र व्ययस्थानातून भ्रमण करत आहे, वेळेचे भान ठेवा. बेकायदेशीर गोष्टींमध्ये पडू नका. कोणत्याही गोष्टीची खात्री झाल्याशिवाय वार्ता करणे टाळा. नोकरीमध्ये दडपणाखाली राहण्याचा कालावधी संपेल. प्रस्ताव कोणताही असो, त्यावर विचार करून स्वत: निर्णय घ्या. व्यवसायात उत्पादनातील मागणी वाढलेली असेल. त्यामुळे अचानक उत्पादन वाढवावे लागेल. मोठ्या व्यवहारांनासुद्धा कलाटणी मिळेल. मागणी तसा पुरवठा करावा लागेल. खर्चाच्या नोंदी ठेवा. खर्चीक गोष्टींना लगाम घाला. राजकीय क्षेत्रात नियमांच्या चौकटीत राहा. भावंडांच्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेणे गरजेचे राहील. शेजारधर्माशी जेवढ्यास तेवढे राहा. मानसिकदृष्ट्या दोलायमान स्थिती ठेवू नका. आध्यात्मिक गोष्टीत मन रमवा. आरोग्याचे पथ्य-पाणी सांभाळा. >> शुभ दिनांक : २, ३ >> महिलांसाठी : कोणाच्याही मैफिलीत सहभागी होताना विचार करा. मनाचा कणखरपणा व निरपेक्ष भावना ही स्थिती अनुकूलता मिळवण्यास योग्य राहील. नोकरीच्या ठिकाणी योग्य मुद्दे मांडावे लागतील. त्यानंतर त्यावर काम करण्यास तयारी करा. निश्चित कामाचा वेग वाढवावा लागेल. वरिष्ठ काही जबाबदारी तुमच्याकडेच सोपवतील. ती पूर्ण करण्यास तुमचा युक्तिवाद कमी पडेल. तुम्ही तुमच्या कामांमध्ये कार्यमग्न राहा. नवीन संशोधन फलद्रूप होईल. व्यावसायिक जबाबदारी वाढल्याने ठरवून ठेवलेल्या कामांमध्ये बदल होतील. नवीन व्यावसायिक करार करताना कागदपत्रांची योग्य हाताळणी करा. इतरांवर विश्वास ठेवून कोणतेही काम करू नका. उधारी वसूल होईल. राजकीय घडामोडींचा आढावा घेताना सतर्कता बाळगा. प्रत्येक गोष्ट नियमात राहूनच करा. कौटुंबिकदृष्ट्या संवादातून वाद वाढवू नका. उष्णतेच्या विकारांना जपा. >>> शुभ दिनांक : ३१, ६ >> महिलांसाठी : इतरांच्या बरोबर स्वत:चीही काळजी घ्या. दरवेळीप्रमाणे भावनिक गोष्टीत अडकण्याचा मोह टाळा. निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घ्या. प्रत्येक पाऊल हे विचाराने टाकले पाहिजे, याचा विचार करा. नोकरदार व्यक्तींनी ज्येष्ठ व्यक्तींशी बोलताना वातावरण बिघडू देऊ नका. इतरांच्या वैयक्तिक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू नका. व्यापार-उद्योग क्षेत्रात काल्पनिक गोष्टीत न रमता प्रत्यक्षातील स्थिती पाहा. भागीदारीमध्ये व्यवसाय करण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसाय करणे केव्हाही तुमच्यासाठी चांगले राहील. व्यापारी क्षेत्रात व्यवहाराला महत्त्व द्या. र्आिथकदृष्ट्या खर्चाचे ताळतंत्र नेमके ठरवा. सामाजिक गोष्टींचा योग्य समतोल साधता येईल. जुन्या मैत्रीशी संवाद होईल. मुलांसाठी वेळ द्या. कुटुंबाला एकत्रित सामावून घ्या. आरोग्य उत्तम राहील. >> शुभ दिनांक : १, २ >> महिलांसाठी : प्रामाणिकपणे कार्य केल्यास उत्तम न्याय मिळेल. चंद्राचे भ्रमण हे भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. घसरलेला कल पुन्हा योग्य वळणावर येईल. सरकारी कर्मचारी वर्गाला शुभ बातमी समजेल. नोकरीचा पेच मार्गी लागेल. इतके दिवस वाट पाहत होता ती वेळ आता आलेली आहे. महत्त्वांच्या मुद्द्यांवर चर्चा होईल. ही चर्चा मनाला दिलासा देणारी ठरेल. व्यावसायिकदृष्ट्या समोर येणारे प्रस्ताव स्वीकारा. ज्या गोष्टी तुमच्या आवाक्यात आहेत, त्या करण्याचा प्रयत्न करा. जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन कराल. ठरवलेली कामे पूर्णत्वाला जातील. पैशांच्या बाबतीत डोक्यावरचे ओझे खांद्यावर येईल अशी स्थिती पाहावयास मिळेल. राजकीय क्षेत्रात तुमच्या शब्दाला मान मिळेल. नातेवाईकांच्या भेटीगाठीचा आनंद घ्याल. आरोग्य उत्तम राहील. >> शुभ दिनांक : ४, ५ >> महिलांसाठी : दूरवरच्या गोष्टींचा आत्ताच विचार करत बसू नका. सप्ताहात चंद्राचे भ्रमण शुभ फलदायी ठरेल. हीच ती संधी आलेली आहे, असे समजून सुरुवात करा. कामावर वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य उत्तम मिळेल. आजचे काम उद्यावर ढकलण्याची वेळ येणार नाही. नियोजन केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. शासकीय कामातील अडथळे कमी होतील. वेतनवाढीचा प्रश्न मिटेल. लघुलेखक, वृत्तपत्र संपादक, पत्रकार यांना अनुकूल परिस्थिती असेल. वरिष्ठांचे प्रोत्साहन मिळाल्यामुळे आनंद द्विगुणित होईल. कामातील आत्मविश्वास वाढता राहील. बचतीत वाढ कराल. सामाजिक क्षेत्रात चौफेर विचार महत्त्वाचा राहील. भावंडांशी असलेला दुरावा कमी होईल. वैवाहिक जोडीदाराशी जुळणारा सूर उत्तम राहील. धार्मिक गोष्टींसाठी पूर्वी केलेले नियोजन सध्या उपयोगात आणता येईल. प्रकृती उत्तम असेल. >> शुभ दिनांक : १, ६ >> महिलांसाठी : हक्काच्या कामात यश मिळेल. आळस झटकून कामाला लागा. धरसोड वृत्ती कमी करा. एखादे विश्वसनीय काम इतरांवर टाकू नका. तातडीने अंमलबजावणी करणे हिताचे राहील. वेळेचा उपयोग करून ध्येय साध्य करा. ज्या गोष्टी कामाच्या बाबतीत अवघड होत्या, त्या व्यवस्थित मार्गी लागतील. त्यासाठी तुमचे परिश्रम उपयोगी पडतील. व्यवहारात काही निवडक गोष्टींना दुजोरा द्या. गुंतवणुकीतून फायद्याचे प्रमाण ठरवा. त्यानंतरच विचार करा. नेहमीपेक्षा आवक चांगली राहील. धावपळीचा कालावधी राहील. नियोजन बदलू नका. अडचणीच्या काळात अपेक्षित मदत मिळेल. आलेल्या फायद्यातून बचतीत वाढ करा. सार्वजनिक क्षेत्रात तुमच्या मार्गदर्शनाचा इतरांवर प्रभाव पडेल. नातेवाईकांशी येणारे दुराव्याचे संबंध वेळीच थांबवा. प्रकृती जपा व औषधांच्या वेळा पाळा. >> शुभ दिनांक : ४, ५ >> महिलांसाठी : अडचणीवर मात करायला शिका. चंद्र भ्रमण षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होत आहे. तेव्हा मनाची मानसिकता बदलून तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये नरम-गरम स्थिती राहील. नकारार्थी विचारातून बाहेर पडा. नवख्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. उद्योगधंद्यात मोठ्या उलाढाली करण्याचे नियोजन थांबवा. कर्ज काढून भांडवलात वाढ करू नका. दुसऱ्यांच्या मतावर तुमचे मत ठरवू नका. वेळेवर निर्णय घेतल्यास फायदा होईल. प्रयत्नवादी राहून कुठेही कमी न पडता कष्ट करा, यश मिळेल. खर्चाची योग्य अशी तरतूद केल्यास पैशांची अडचण जाणवणार नाही. सामाजिक माध्यमांचा योग्य कारणासाठी उपयोग करा. घरातील सदस्यांसमवेत बोलताना शब्दप्रयोग जपून वापरा. आरोग्याची काळजी घ्या. >> शुभ दिनांक : १, २ >> महिलांसाठी : वागण्या-बोलण्यातील अहंपणा कमी करा.

Operation Sindoor Live Updates: एअर स्ट्राईकनंतर शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले…