छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आता राजकीय वजाबाकीचे खेळ सुरू झाले आहेत. शिवसनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना २०१९ मध्ये मिळालेली भाजपची मते आता त्यांच्याकडून वजा झाली आहेत. एमआयएमच्या इत्मियाज जलील यांना मिळालेल्या मतदानातून वंचितचा मतदार उणे झाला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा आहे, त्या संदीपान भुमरे यांचा पैठण मतदारसंघच जालना लोकसभा मतदारसंघात आहे. एका बाजूला अशी वजाबाकी सुरू असताना मराठा मतपेढीमध्ये वजाबाकी व्हावी असे प्रयत्न ‘महायुती’कडून केले जात आहेत. मतपेढीऐवजी मतविभागणीला आता प्राधान्य दिले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हिंदू- मुस्लिम आणि मराठा- ओबीसी अशा प्रकारे विभागलेला. यामध्ये महायुतीकडून प्राधान्य दिले जाईल असे सांगण्यात येत आहे. संदीपान भुमरे यांच्या उमेदवारीची चर्चा याच अंगाने केली जात असून त्यांचे आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचेही चांगले संबंध आहेत. त्यांना जरांगेही ‘मामा’ म्हणतात. आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी साधलेला समन्वयही सत्ताधारी पक्षांमध्ये महत्त्वपूर्ण मानला जातो. मात्र, भुमरे यांचा बांधलेला मतदार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात नाही. त्यामुळे प्रमुख उमेदवारांच्या उणे मतपेढीचा खेळ रंगू लागला आहे. मराठा ध्रुवीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा हर्षवर्धन जाधव यांनीही निवडणुकीच्या रिंगणात असणार, असे जाहीर केले आहे. वंचित आघाडीने एमआयएमच्या विरोधात अफसर खान या मुस्लिम माजी नगरसेवकास उमदेवारी दिली आहे. ‘एमआयएम’च्या मतांमधून वजाबाकी व्हावा असे या उमेदवारीमागचा होरा असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

हेही वाचा – नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…

हेही वाचा – काँग्रेसला अपेक्षा २००४ च्या ‘सोनिया मॅजिक’ची, राहुल गांधींना शक्य आहे का चमत्कार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परभणी मतदारसंघात मराठा मतांमध्ये विभाजन व्हावे म्हणून पंजाबराव डक यांना वंचितने दिलेल्या उमेदवारीकडे पाहिले जात आहे. बीडमध्येही मराठा उमेदवारांमध्ये ज्योती मेटेच्या उमेदवारीमुळे फूट पडू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. ज्योती मेटे यांनी अद्याप उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतलेला नाही.