राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये असून बुधवारी अयोध्येतील श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी या यात्रेला पाठिंबा दर्शवला होता. दरम्यान, आता विश्व हिंदू परिषदेनेही भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. विश्व हिंदू परिषदेचे सचिव चंपत राय तसेच राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी राहुल गांधी यांचे समर्थन केल आहे. भारत जोडो यात्रा ही देशाला एकसंघ करणारी यात्रा असल्याचे दोघांनी म्हटले आहे.

हेही वाचा – “नितीश कुमार शिखंडी, सुरक्षारक्षकाच्या भूमिकेत आले अन्…”, RJD च्या नेत्याची मुख्यमंत्र्यावर घणाघाती टीका

भारत जोडोला VHPचा पाठिंबा

यासंदर्भात बोलताना चंपत राय म्हणाले, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा देशाला एकसंघ करणारी यात्रा आहे. त्यामुळे या यात्रेवर टीका करण्याचे कोणतंही कारण नाही. मी आरएसएसचा कार्यकर्ता असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही अद्याप भारत जोडो यात्रेवर टीका केलेली नाही. देशातील तरुण हजारो किलोमीटर चालून देश समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे कौतुकास्पद आहे. राहुल गांधींसारखी व्यक्ती थंडीत तीन हजार किलोमीटर पायी चालते, त्यांचे कौतुक करणे गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “कर्नाटकमधील ‘नंदिनी’ डेअरीचं ‘अमूल’मध्ये विलीनीकरण होणार नाही”, अमित शाहांच्या विधानावर बोम्मईंचा यू-टर्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका

दरम्यान, अयोध्येतील महंतांनी राहुल गांधींचं कौतुक केल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर टीका केली आहे. योगी आदित्यनाथ हे सद्या मुंबई दोऱ्यावर असून येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “यादेशात व्यक्ती स्वातंत्र आहे. प्रत्येकाला यात्रा काढण्याचा, आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपण त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा. पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीकाही केली. काँग्रेसला जर भारत जोडायचा असेल तर ते त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवले पाहिजे. मात्र, काँग्रेसच्या कृतीतून तसे होताना दिसत नाही. तवांग आणि अरुणाचल प्रदेश येथील घटनानंतर काँग्रेसचे ज्या पद्धतीने विधानं केली आहेत. ती विधाने भारत जोडण्यासाठी नाही, तर भारत तोडण्यासाठी होती”, असेही ते म्हणाले.