लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे प्रतिनिधित्व करणारे सुधाकर शृंगारे यांना २०२४ ला पुन्हा उमेदवारी मिळेल का, असा प्रश्न काहीजण उपस्थित करत होते. त्यात भाजप अंतर्गत राजकारणाचीही किनार आहे. माजी खासदार सुनील गायकवाड यांचे ज्येष्ठ बंधू अनिल गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर कार्यकारी संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल गायकवाड निवृत्त झाल्यानंतर ते लातूर लोकसभेचे उमेदवार असू शकतील अशी चर्चा सुरू झाली होती. या नियुक्तीमुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल गायकवाड यांचे धाकटे बंधू सुनील गायकवाड हे दोन वेळा भाजपचे उमेदवार होते. एक वेळा ते निवडून आले व एक वेळा त्यांचा निसटता पराभव झाला. मात्र, तिसऱ्या वेळी त्यांची उमेदवारी नाकारत सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली व शृंगारे विजयी झाले. सुधाकर शृंगारे यांच्याऐवजी गायकवाड घराण्यात उमेदवारी मिळावी असा प्रयत्न होता. सुनील गायकवाड यांना पुन्हा संधी मिळणे अवघड असल्यामुळे अनिल गायकवाड यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांची नियुक्ती झाल्यामुळे चर्चेला पूर्णविराम देण्यात आला आहे.

हेही वाचा – आठ कोटींमुळे भाजपाच्या खासदार किरण खेर वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?

हेही वाचा – पोटनिवडणुकीवरून पुण्यातील राजकीय पक्षांमध्ये संभ्रम

काँग्रेसकडे अजूनही उमेदवाराचे नावही चर्चेत नाही. सुधाकर शृंगारे यांनी आपल्या कारकिर्दीत लोकांशी संपर्क ठेवला, खासकरून रेल्वेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला, त्यामुळे पक्ष त्यांनाच उमेदवारी देईल असे चित्र होते. ते आता अधिक गडद झाले आहे. पक्षाअंतर्गत त्यांच्या विरोधात आता दुसरे नाव चर्चेतही नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil gaikwad appointment to the road development board has cleared the knot for latur loksabha election candidature print politics news ssb
First published on: 14-12-2023 at 16:05 IST