छत्रपती संभाजीनगर : लाडकी बहीण योजनेबरोबरच राज्यात दहा हजार महिलांना ई-रिक्षा देण्याच्या कार्यक्रमाचा आरंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रत्येक महापालिका क्षेत्रात किमान ५०० रिक्षा महिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील काळात हे प्रमाण दुप्पट केले जाईल, असे महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

मराठवाड्यात लाडकी बहीण योजनेसाठी ६१७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून ऑक्टोबर व नोव्हेंबरमधील रक्कमही सरकारने पाठविली आहे. पूर्वी रक्षाबंधनाची ओवाळणी देण्यात आली होती. आता भाऊबीजही ‘अॅडव्हान्स’ दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा : Haryana Exit Poll: सत्ता टप्प्यात दिसताच काँग्रेससमोर मुख्यमंत्री पदाचा पेच; पद एक, दावेदार अनेक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात दोन कोटी २२ लाख लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असून येत्या काही दिवसांत ही संख्या अडीच लाख करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पाच हजार आणि तीन हजार रुपयांची घसघशीत वाढ दिल्याची आठवणही या वेळी करून देण्यात आली. महिलांना ई-रिक्षा देण्याच्या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. पुढील काळात २० हजार ई-रिक्षा देण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.