छत्रपती संभाजीनगर : निवडून आल्यानंतर आणि पराभव झाल्यानंतरही तुम्हीच माझी प्रतिष्ठा वाढवली आहे. त्यामुळे पराभवाने मी निराश झाले नाही. उलट आता पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यभर दौरा करणार आहे. येत्या काळात जेव्हा ऊसतोडणीचा हंगाम सुरू होईल तेव्हा मला विचारल्याशिवाय तोडणीला जाऊ नका. येत्या काळात देवी अवतारातील ‘ काली माँ’चे रूप बनून आपण येऊ, असे त्या म्हणाल्या. भगवानबाबाचे जन्मस्थळ असणाऱ्या सावरगावघाट येथे त्या ‘दसरा मेळाव्यात’ बोलत होत्या. आपल्यालाही आपला डाव खेळायचा की नाही, असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थितांना केला.

हेही वाचा : “महायुतीने भावी विरोधी पक्षनेता कोण याची चिंता करावी!”, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येणारा माणूस लाभार्थी संमेलनातील नसून ज्यांना कोणतेच लाभ मिळालेले नाहीत, अशा मागास ऊसतोडणी कामगार आहे. त्यांच्या विकासासाठी आयुष्यभर काम करण्याचा वारसा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी दिला आहे. त्यामुळे त्यासाठी सातत्याने काम करू. पराभवानंतर निराश झाले नाही. कारण गोरगरिबांसाठी काम करायचे आहे. भगवानबाबांच्या चरणी दसरा मेळाव्यात १८ पगड जातीतील लोक येतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायचे असल्याने पुढील काळात महाराष्ट्रभर फिरणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. या वेळी दसऱ्याची परंपरा जपल्याबद्दल नेते धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांचे कौतुक केले. गेली बारा वर्षे या मेळाव्याला आलो नाही. तो प्रारब्धाचा फेरा संपल्याचेही ते म्हणाले. या वेळी गणेश हाके, महादेव जानकर, डॉ. सुजय विखे, मोनिका राजळे, नमिता मुंदडा, मेघना बोर्डीकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास भगवानबाबांच्या भक्तांची व पंकजा मुंडे समर्थकांची मोठी गर्दी होती. १२ वर्षांनी पहिल्यांदाच धनंजय मुंडे हेही दसरा मेळाव्यात सहभागी झाले होते. प्रा. गणेश हाके यांचा उल्लेख ‘गोंडस’ असा करत पंकजा मुंडे यांनी केला.