"मोदी कुत्र्यासारखे मरतील, मोदी हिटलरसारखे...", पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका | pm narendra modi will die like dog and die like hitler gujarat election 2022 congress rmm 97 | Loksatta

“मोदी कुत्र्यासारखे मरतील, मोदी हिटलरसारखे…”, पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

मला शिव्या देण्यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये चढाओढ सुरू असते, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

“मोदी कुत्र्यासारखे मरतील, मोदी हिटलरसारखे…”, पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सध्या गुजरातमध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. गुरुवारी (१ डिसेंबर) गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील विरोधी पक्ष काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. मला शिव्या देण्यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये चढाओढ सुरू असते, अशी टीका पंतप्रधानांनी केली. ते गुजरातमधील कालोल येथे भाजपाच्या प्रचारसभेत बोलत होते.

या सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “अलीकडेच, एक काँग्रेस नेता म्हणाला मोदी कुत्र्यासारखे मरतील, दुसरा म्हणाला मोदी हिटलरसारखे मरतील. पाकिस्तानने मला मारावं, यासाठी ते वाट पाहत आहेत. ते मला रावण, राक्षस आणि झुरळ म्हणतात,” असं पीएम मोदी म्हणाले. “काँग्रेसने माझ्यावर कितीही चिखलफेक केली तरी त्यातून आणखी कमळं फुलताना दिसतील, हे काँग्रेस नेत्यांना कळत नाही” असा टोला मोदींनी लगावला. याबाबतचं वृत्त ‘इनशॉर्ट’ने दिलं आहे.

हेही वाचा- Gujarat Election: काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढींच्या जाहीर सभेत गोंधळ, AIMIM वर टीका करताच…

यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार केला. “नरेंद्र मोदी यांना रावणाप्रमाणे १०० डोकी असतील, ज्यामुळे ते निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वत्र जाण्याचा प्रयत्न करत असतील. मोदीजी पंतप्रधान आहेत. आपले कर्तव्य विसरून ते महानगरपालिकेच्या निवडणुका, आमदारकीच्या निवडणुका, खासदारकीच्या निवडणुका अशा सर्वच ठिकाणी प्रचार करत फिरतात. प्रत्येक वेळी ते स्वतःबद्दल बोलत असतात. तुम्हाला कुणाकडे बघण्याची गरज नाही, फक्त मोदींना बघा आणि मते द्या, अशी त्यांची रणनीती असते. पण आपण त्यांचाच चेहरा किती वेळा पाहायचा? त्यांची नेमकी किती रूपे आहेत? त्यांना रावणसारखी १०० डोकी आहेत का?” असा सवाल मंगळवारी खरगेंनी विचारला होता.

हेही वाचा- Gujarat Election 2022: “स्मृती इराणींच्या प्रचारसभेला उपस्थित राहा”, शिक्षकाचा विद्यार्थ्यांना आदेश

खरगेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना मोदी गुरुवारी म्हणाले, “ज्यांनी कधीच प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवला नाही. त्यांनीच आता रामायणातील रावणाशी माझी तुलना केली.”

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 23:13 IST
Next Story
मंत्रपठण-पूजाअर्जा करून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदाचा हंसराज अहिर यांच्याकडून स्वीकार