चंद्रशेखर बोबडे

नागपूर: शिंदे गटाशी युती करून सत्तेत आलेल्या भाजपला विदर्भात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भात काहीही फायदा झाला नसल्याचे निवडणूक निकाल दर्शवतो. विशेष म्हणजे एकसंघ असलेल्या शिवसेनेसोबत युती असताना भाजपने विदर्भतील दोन्ही जागा जिंकल्या होत्या. आता दोन्ही जागा गमावल्या.

The discussion that the constitution will be changed again after the BJP raised slogans in the Lok Sabha elections has spread unrest among the Dalit community
दलित समाजात अस्वस्थता; भाजपच्या ‘चार सौ पार’च्या घोषणेने संविधान बदलाची चर्चा
Wardha, sea islands, Shailesh Aggarwal,
वर्धा : समुद्रालगत बेटांवरील मतदारसंघाची जबाबदारी जिल्ह्यातील ‘या’ नेत्याकडे
nhai postponed decision to increase toll tax
निवडणुकीचा वाहनचालकांना असाही दिलासा! आचार संहितमुळे वाढीव टोलमधून सुटका
Naxalites active again in Lok Sabha election hype Brutal killing of tribal citizen in Gadchiroli
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नक्षलवादी पुन्हा सक्रिय; गडचिरोलीत आदिवासी नागरिकाची निर्घृण हत्या

हेही वाचा >>>तेलंगणातील दुसरा पक्ष राज्यात जम बसविणार का ?

नुकत्याच विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणुका पार पडल्या.यापैकी दोन जागा विदर्भात होत्या. . एक अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातील होती व दुसरी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील होती. या दोन्ही जागा बारा वर्षापासून म्हणजे २०११ पासून भाजपकडेच होत्या. यावेळीही भाजपने वरील दोन्ही विद्यमान आमदाराना पुन्हा उमेदवारी दिली. या निवडणुकीत भाजपची शिंदे गटाशी युती होती. अमरावती विभागातील दोन खासदार व तीन आमदार शिंदे गटाकडे आहे तर नागपूर विभागात दोन आमदार व एक खासदार शिंदेसोबत आहेत. मात्र त्यांचा कोणताही राजकीय फायदा भाजपला झालेला नाही. भाजपने अमरावती पदवीधर आणि नागपूर शिक्षक या दोन्ही जागा गमावल्या .शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खरी असल्याचा दावा भाजपचे सर्व नेते करीत असून त्यांच्याच सोबत युती करून पुढच्या लोकसभा व विधानसभा निवडणुका लढणार असल्याचे भाजपने यापूर्वीच जाहीर केले आहे. या पाश्वभूमीवर विदर्भात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल महत्वाचे ठरते.

हेही वाचा >>>कसब्यात बहुजनांचे प्राबल्य

शिंदे गटाने त्यांचे उमेदवार या निवडणुकीत उभे केले नसले तरी विदर्भातील दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांना शिंदे गटाचा पाठिंबा होता. या भागात शिंदे गटाकडे एकूण पाच आमदार व तीन खासदार आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघात येणाऱ्या सहा जिल्ह्यांपैकी बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह दोन आमदार अनुक्रमे संजय गायकवाड आणि संजय रायमुलकर, यवतमाळ जिल्ह्यात दिग्रसचे आमदार संजय राठोड व यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी या शिंदे गटासोबत आहेत. यापैकी संजय राठोड हे मंत्री आहेत. त्याच प्रमाणे अमरावती जिल्ह्यात प्रहारचे बच्चू कडू आणि त्यांच्याच पक्षाचे राजकुमार पटले या दोन आमदारांचा शिंदे यांना पाठिंबा आहे.यानंतरही भाजपला अमरावती पदवीधर मतदारसंघाची सलग दोन वेळा जिंकलेली जागा गमवावी लागली. या मतदारसंघात चुरशीची लढत झाली व महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी झाले.

हेही वाचा >>>चंद्रशेखर राव यांचा राज्यात ‘किसान सरकार’चा नारा

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात येणाऱ्या सहा जिल्ह्यांपैकी शिंदेगटागडे एक खासदार व दोन आमदार आहेत नागपूर जिल्ह्यातील खासदार कृपाल तुमाने (रामटेक) आणि आमदार आशीष जयस्वाल (रामटेक) तसेच भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा समावेश आहे. मात्र या मतदारसंघात भाजपचे नागोराव गाणार यांचा दारून पराभव झाला. यावरून शिंदेगटाशी युती भाजपसाठी विदर्भात तरी फायदेशीर ठरली नाही हे निवडणूक निकालावरून स्पष्ट होते.

दरम्यान भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नाही, अन्यथा अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल वेगळा लागला असता, असे सेनेचे (शिंदे) बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले.