तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. इंग्रजी भाषेवर असलेले प्रभुत्व आणिआपल्या तडफदार भाषणशैलीमुळे त्यांनी कमी कालावधित राजकीय वर्तुळात सर्वपरिचित झाल्या. मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. दरम्यान, त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत त्या व्हिडीओला खास कॅप्शन दिले आहे. मोईत्रा यांनी दिलेले हे कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ठाकरे गट-वंचितच्या हातमिळवणीवर प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वाचे भाष्य; म्हणाले “मी अजूनही सांगतो युती झाली, पण…”

मोईत्रा यांनी बनवला चहा

महुआ मोईत्रा यांनी समाजमाध्यमावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या रस्त्यावरील एका स्टॉलवर चहा बनवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील आहे. एकीकडे मोईत्रा चहा बनवताना दिसत असून दुसरीकडे त्यांच्या आजूबाजूला बरेच लोक जमलेले दिसत आहेत.

हेही वाचा >>> अमोल मिटकरींचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल, हसन मुश्रीफांचा उल्लेख करत म्हणाले “त्यांची जबान…”

कॅप्शनची होतेय चर्चा

मोईत्रा यांनी हाच व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत खास कॅप्शन दिले आहे. ‘मी आज चहा बनवण्याचा प्रयत्न केला. ही कृती मला कुठे घेऊन जाईल काय माहिती?’ असे त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे. महुआ मोइत्रा यांनी दिलेल्या कॅप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडले जात आहे. “सध्या एक चहावाला पुरेसा आहे. आता देशाला आणखी एक चहावाली झेपू शकेल की नाही काय माहिती?” असे मिश्कील ट्वीट एका नेटकऱ्याने केले आहे. तर मॅडम महुआ मोईत्रा देशाच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान होण्याच्या मार्गावर आहेत, असे दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे.

हेही वाचा >>> ‘धर्मवीर’ वादावर बोलताना नितेश राणेंची जीभ घसरली! अमोल कोल्हेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले “दाढी काढल्यावर त्याला…”

दरम्यान, सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसकडून ‘दीदीर सुरक्षा कवच’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आगामी ६० दिवसांत तब्बल १० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. याच कारणामुळे महुआ मोईत्रा यांच्यासह तृणमूलचे अन्य नेते लोकांमध्ये मिसळताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc mp mahua moitra made tea on tea stall in west bengal prd
First published on: 12-01-2023 at 16:18 IST