News Flash

पिंपरीत सात हजारांची लाच घेताना महिला तलाठी जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई

प्रातिनिधिक छायाचित्र

पिंपरीमध्ये तलाठी महिलेला ७ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तलाठी महिलेसह तिच्या साथीदारालादेखील दुपारी अटक केली आहे. वैशाली मोरे असे अटक करण्यात आलेल्या तलाठी अधिकाऱ्याचे नाव आहे. तर साथीदाराचे नाव परमेश्वर बनसोडे असल्याची माहिती मिळते आहे.

पिंपरी येथे तलाठी कार्यालयात तलाठी या पदावर कार्यरत असलेल्या वैशाली नामदेव मोरे (वय वर्षे ३६) यांनी नेहरुनगरमधील व्यापाऱ्याला घराची आणि सातबाराची नोंदणी करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच मागितली होती. यानंतर नेहरुनगरच्या व्यापाऱ्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाने सापळा रचून आज दुपारी पिंपरीतील तलाठी कार्यालयात तलाठी वैशाली मोरे यांना ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. वैशाली मोरे यांच्यासोबत असलेल्या परमेश्वर बनसोडे यांनादेखील पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2017 11:13 pm

Web Title: acb arrested talathi while accepting bribe
Next Stories
1 बालगंधर्व रंगमंदिरात तोडफोड; प्रवेश न दिल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ
2 पुण्यातील महापालिकेच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूकडून कबड्डीचे धडे
3 सरकारमध्ये सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी!: सुधीर मुनगंटीवार
Just Now!
X