बारामतीमधील शेतक ऱ्याच्या उपक्रमामुळे नुकसान टळले

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींमुळे शेतक ऱ्यांना शेतीमाल विक्रीस आणणे शक्य होत नसून त्यामुळे शेतक ऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहेत. या पाश्र्वभूमीवर बारामतीतील मळद गावातील शेतकरी प्रल्हाद वरे यांनी थेट शेतातून शेतीमालाची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

बारामती तालुक्यातील मळद गावात प्रल्हाद वरे यांची सहा एकरांवर शेती आहे. वरे यांनी शेतात कलिंगड, टरबुजाची लागवड केली असून कलिंगड, टरबूज तयार झाली आहेत. संचारबंदीच्या काळात शहरात शेतीमाल पोहोचविण्यास विलंब होत असल्याने वरे यांनी थेट शेतातून ग्राहकांना रास्त दरात कलिंगड, टरबूज अशा फळांची विक्री सुरू केली आहे. वरे यांच्या योजनेला ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. बारामती परिसरातील किरकोळ विक्रेत्यांनी वरे यांच्याकडून कलिंगड, टरबूज खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

करोनामुळे वाहतूक व्यवस्था, तसेच बाजार बंद असून घाऊक खरेदीदार आणि घरगुती ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे वरे यांनी थेट शेतातून शेतीमाल विक्रीची योजना आखली. समाजमाध्यमातून त्यांनी शेतातून फळांच्या विक्रीची जाहिरात दिली. त्यात मोबाइल क्रमांक नमूद केला. ग्राहक वरे यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून मागणी नोंदवित आहेत. शेतातून विक्री सुरू केल्यामुळे वरे यांचे नुकसान टळले आहे.

शेतात तात्पुरता विक्री स्टॉल

काही महिन्यांपूर्वी प्रल्हाद वरे यांनी त्यांच्या सहा एकर शेतात विविध जातीची कलिंगड आणि टरबुजाची लागवड केली होती. कलिंगड आणि टरबुजाची प्रतवारी चांगली असल्याने ग्राहकांची मागणी आहे. बारामतीतील मळद-नीरावागज रस्त्यावर त्यांनी शेतात तात्पुरता स्टॉल उभारला आहे. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी सुरक्षेबाबतची काळजी घ्यावी तसेच मास्कचा वापर करून खरेदी करावी, अशी सूचना वरे यांनी केली आहे.

ग्राहकांनी फळे आणि भाजीपाला खरेदीसाठी मंडईत खरेदी न करता थेट बांधावरूनच खरेदी केली, तर शेतक ऱ्यांचे नुकसान टळेल. शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन होईल तसेच गर्दीही होणार नाही. ग्राहकांना ताजा शेतीमाल उपलब्ध होईल आणि शेतक ऱ्यांना चार पैसेही मिळतील.

– प्रल्हाद वरे, शेतकरी, मळद, ता. बारामती, जि. पुणे</p>