News Flash

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश नाहीत

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या उत्तराने भाजप तोंडघशी

पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या उत्तराने भाजप तोंडघशी

पिंपरी पालिकेत सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले विविध घोटाळे बाहेर काढण्याचा सपाटा भाजपने लावला आहे. एकेक प्रकरण उकरून भाजपने ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवले आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत होता. मात्र, गुरूवारी पत्रकार परिषदेत बोलताना, एकाही प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आपल्याला चौकशीचे आदेश दिले नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजप नेते तोंडघशी पडल्याचे चित्र पुढे आले आहे. प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार करताना मुख्यमंत्री किंवा अजित पवार यांचा आपल्यावर दबाव येत असल्याची चर्चा व्यर्थ आहे, असा दावाही आयुक्तांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना केला.

आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पिंपरी पालिकेत ‘राष्ट्रवादी विरूद्ध भाजप’ असा सामना रंगला आहे. गेल्या १५ वर्षांच्या काळात सत्तेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने अनेक घोटाळे केल्याचे आरोप करत एकेक प्रकरण बाहेर काढण्याचा एक कलमी कार्यक्रम भाजपने सुरू ठेवला आहे. निवेदने, पत्रकार परिषदा, मोर्चे आदी टप्पे पार  केल्यानंतर संबंधित प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, असा दावा शहर भाजपकडून करण्यात येत होता. त्यानुसार, प्रसिद्धीपत्रके काढली जात होती.

यासंदर्भात, आयुक्तांनी बुधवारी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी इतक्या प्रकरणांमध्ये चौकशीचे आदेश दिले आहेत, याबाबतचे वृत्त आपण वर्तमानपत्रांमध्येच वाचले आहे. प्रत्यक्षात, एकाही प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. आयुक्तांनी अशाप्रकारे भाजपचा दावा खोडून काढल्याने भाजप नेते तोंडघशी पडल्याचे चित्र पुढे आले आहे.

‘मुख्यमंत्री, अजित पवारांचा दबाव नाही’

राज्यातील सत्तेचा उपयोग करून भाजपकडून तसेच पपरी पालिकेतील सत्तेचा आधार घेऊन राष्ट्रवादीकडून प्रभागरचना करताना आयुक्तांवर प्रचंड दबाव टाकण्यात येत आहे. दोन्ही पक्षातील बडय़ा नेत्यांच्या राजकारणात आयुक्तांचे सँडविच झाल्याची, तसेच मुख्यमंत्री व अजित पवारांनी वेगवेगळ्या कारणास्तव आयुक्तांना दूरध्वनी केल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. यासंदर्भात, आयुक्तांकडे विचारणा केली असता, आपल्याला मुख्यमंत्री अथवा अजित पवारांकडून दूरध्वनी आलेला नाही आणि प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप झालेला नाही, असा दावा आयुक्तांनी केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 2:14 am

Web Title: cm devendra fadnavis no order about pimpri municipal corporation scam inquiry
Next Stories
1 मतदार नोंदणीसाठी ‘आर्ची’चे आवाहन
2 चक्रीवादळाची ‘आपत्ती’ रोखणार
3 डेबिट कार्डच्या आमिषाने गंडा घालणारे जेरबंद
Just Now!
X