राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा या आठवडय़ापासून सुरू होणार असून विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी, मानसिक दडपणातून बाहेर काढण्यासाठी राज्यमंडळाच्यावतीने समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यात बारावीची लेखी परीक्षा गुरूवारपासून (२० फेब्रुवारी) आणि दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षेच्या काळामध्ये भीती, दडपण, नैराश्याला अनेक विद्यार्थी सामोरे जात असतात. या विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी राज्यमंडळाने समुपदेशन कक्ष सुरू केला आहे. यासाठी दहा समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी काही प्रश्न असतील, परीक्षेची भीती वाटत असेल, तर त्यासाठी मदतक्रमांकावर संपर्क साधायचा आहे. विद्यार्थ्यांबरोबरच पालकही समुपदेशकांशी संवाद साधू शकणार आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत समुपदेशक मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, या क्रमांकांवर बैठक व्यवस्था, परीक्षा क्रमांक, प्रश्नपत्रिकेबाबत शंकांची उत्तरे दिली जाणार नाहीत, असे राज्यमंडळाच्यावतीने कळवण्यात आले आहे.
समुपदेशकांचे क्रमांक – ९९२२४५३२३५ / ९९६०४८८६१८ / ९४२२०८३८८६ / ९८२२७१३९९५ / ९९६०७६०११४ / ९५५२५३३१८७ / ९८९००५४५१८ / ९४२०४९६३१८ / ९४२२४०७८५० / ९९७००१६९०१