06 July 2020

News Flash

”थेरगावच्या क्रिकेट अकादमीस सचिन तेंडुलकरचे नाव द्यावे’

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या थेरगाव येथील क्रिकेट अकादमीला सचिन तेंडुलकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राजीव गांधी प्रतिष्ठानच्या वतीने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी

| November 11, 2013 02:42 am

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या थेरगाव येथील क्रिकेट अकादमीला भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राजीव गांधी प्रतिष्ठानच्या वतीने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे करण्यात आली आहे. तेंडुलकर यांनी क्रिकेटमध्ये इतिहास घडविला असून अनेक विक्रम त्यांच्या नावावर जमा आहेत. जगभरात देशाचा नावलौकिक वाढवला आहे. सचिन क्रिकेटमधून निवृत्त होत असून सचिनच्या सन्मानार्थ राज्य व केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पिंपरी पालिकेने देखील त्यांचा सत्कार करावा आणि दिलीप वेंगसरकर चालवत असलेल्या थेरगावच्या क्रिकेट अकादमीचे सचिन तेंडुलकर क्रिकेट अकादमी असे नामकरण करावे, अशी मागणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2013 2:42 am

Web Title: demand of give sachin tendulkars name to thergaon cricket acadamy
Next Stories
1 तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा वेतनासाठी झगडा
2 वाकडमध्ये सराफ व पोलिसांमध्ये धक्काबुक्की
3 कांद्याचे दर डिसेंबरपर्यंत भडकलेलेच राहणार!
Just Now!
X