News Flash

हिंजवडी आयटी हबमध्ये उद्यापासून आठ दिवस कडकडीत लॉकडाउन

आयटी कंपनी, अत्यावश्यक सेवा यांना सूट

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीसह परिसरात उद्यापासून (गुरूवार) करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडकडीत लॉकडाउन पाळण्यात यावा, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे. हिंजवडीसह मान, मारुंजी, जांबे, नेरे, या ठिकाणी ही लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा आणि आयटी कंपन्यांना यामधून वगळण्यात आल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.

हिंजवडी परिसरात उद्यापासून १६ जुलै पर्यंत कडकडीत लॉकडाउन पाळला जाणार आहे. दरम्यान, यामधून अत्यावश्यक सेवा, आयटी कंपनी तसेच बांधकाम सुरू असलेल्या साईट्सना वगळण्यात आले आहे. अशी माहिती हिंजवडीच्या सरपंच आरती वाघमारे आणि मारुंजी  सरपंच पूनम बुचडे यांनी दिली आहे.

अत्यावश्यक सेवा वळगून पहाटे ६ ते ९ यावेळेत दूध पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, ही कडक पावलं उलचण्यात आल्याचे सरपंचांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, हिंजवडी परिसरात विनामास्क नागरिक आढळल्यास त्याला ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 2:22 pm

Web Title: eight days of severe lockdown from tomorrow at hinjewadi it hub msr 87 kjp 91
Next Stories
1 गाळ काढण्याच्या कामात गोलमाल
2 दोन दिवसांत शहराला महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा
3 पदव्युत्तर शिक्षणात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासक्रम
Just Now!
X