‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’तील (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अखेर दखल घेतली आहे. मंत्रालयाने शुक्रवारी (३ जुलै) या विद्यार्थ्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक डी. जे. नारायण यांनी शनिवारी दिली.
एफटीआयआयच्या नियामक मंडळ अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवित विद्यार्थ्यांनी गेल्या १६ दिवसांपासून बेमुदत बंद आंदोलन सुरू केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 28, 2015 5:06 am