06 March 2021

News Flash

पुण्यात इंजिनिअर पत्नीने रचलं पतीला नपुंसक बनवण्याचं कारस्थान कारण…

मागच्या आठवडयात दोघे हनीमूनसाठी महाबळेश्वरला गेले....

पतीने पत्नीवर नपुंसक बनवण्याचं कारस्थान रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. काही महिन्यांपूर्वीच लॉकडाऊनच्या काळात त्यांचं लग्न झालं होतं. पुण्यातील ही घटना असून, वारजे माळेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी पतीने पत्नीविरोधात तक्रार नोंदवली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
पत्नीवर इतके गंभीर आरोप करणारा पती पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, तर पत्नी मेकेनिकल इंजिनिअर आहे. लग्नाआधी पत्नीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. विवाहानंतर आपण आपले नाते तोडून टाकायचे, असे दोघांनी ठरवले. पण त्यानंतरही त्यांच्यात प्रेमसंबंध कायम होते. पुणे मिररने हे वृत्त दिले आहे.

पतीला पत्नीच्या कारस्थानाबद्दल कसं कळलं?
लॉकडाऊनच्या काळात लग्न झाल्यामुळे पती-पत्नीला हनीमूनसाठी जाता आले नाही. अनलॉकचा फेज सुरु झाल्यानंतर दोघे नवरा-बायको मागच्या आठवडयात हनीमूनसाठी महाबळेश्वरला गेले. तिथे एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. पत्नीचा प्रियकर सुद्धा त्याच हॉटेलमध्ये उतरला होता. तिथे त्याने महिलेच्या पतीसोबत मैत्री केली. आपण ज्याच्यासोबत मैत्री केलीय, त्याचे आपल्या पत्नीसोबत प्रेम प्रकरण सुरु आहे, याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. तिघांनी हॉटेलमध्ये एक पार्टी सुद्धा केली.

चांगली ओळख झाल्यानंतर महिलेच्या प्रियकराने तिच्या पतीला सांगितले की, मी वारजेमध्ये राहतो. लॉकडाऊनमुळे माझी नोकरी गेलीय. त्यामुळे मला घरभाडे आता परवडत नाहीय. मी तुमच्या घरी येऊन राहू शकतो का? अशी त्याने विचारणा केली. महिलेच्या पतीने त्याचा प्रस्ताव मान्य केला व त्याला आपल्या घरी राहण्यास परवानगी दिली.

त्यानंतर एकदिवस महिलेच्या पतीने ट्रीपचे फोटो बघण्यासाठी म्हणून त्याला मोबाइल द्यायला सांगितला. मोबाइलवर फोटो पाहत असताना, त्याला पत्नीच्या घराचे फोटो दिसले. त्यावेळी महिलेच्या पतीच्या मनात संशय निर्माण झाला. एकारात्री पत्नीचा प्रियकर गाढ झोपेत असताना महिलेच्या पतीने त्याचा मोबाइल तपासला, त्यावेळी त्याला धक्का बसला. आपल्या पत्नीचे सदर व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरु असल्याचे त्याला समजले. त्याचवेळी मोबाइलचे मेसेज तपासत असताना पतीला दोघांनी मिळून त्याला नपुंसक बनवण्याचा कट रचल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पती थेट अहमदनगरला त्याच्या घरी निघून गेला व आई-वडिलांना या प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर वारजे गाठून थेट पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी व तिच्या प्रियकराविरोधात तक्रार नोंदवली. घटस्फोट घेण्यासाठी पतीला नपुंसक बनवण्याचे कारस्थान दोघांनी रचले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 11:49 am

Web Title: in pune with help of lover wife plot to make husbund impotent dmp 82
Next Stories
1 नदी शुद्धीकरण प्रकल्पात पुन्हा अटींचा भंग
2 Coronavirus : करोनामुक्तीचे प्रमाण पुण्यात सर्वाधिक
3 खासगी वापराच्या वाहनांची खरेदी कायम
Just Now!
X