News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये मिनी लॉकडाउनला व्यापारी, नागरिकांकडून प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड शहरात सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आजपासून(शनिवार) मिनी लॉकडाउनला सुरूवात झाली असून, नागरिक आणि व्यापारी वर्गातून या मिनी लॉकडाउनला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. पहिल्याच दिवशी बरोबर सायंकाळी सहा वाजता शहरातील विविध भागात पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान, शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून पिंपरीला पाहिलं जातं त्या ठिकाणी देखील वेळेत दुकाने बंद करून प्रशासनाला सहकार्य करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतु, करोना आटोक्यात येत नसल्याने पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिनी लॉकडाउनबाबत निर्णय घेतला. त्यानुसार, आजपासून पिंपरी-चिंचवड शहरात सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, सात दिवस शहरातील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट बंद असणार असून पार्सल सुविधा सुरू राहणार आहेत. यासह मॉल, धार्मिक स्थळे देखील बंद राहणार आहेत.

तर, आज अनेक ठिकाणी नागरिकांची थोडी धावपळ झाल्याचे देखील पाहायला मिळाले. याशिवाय अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील दिसून आली . नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सात दिवस मिनी लॉकडाउनला प्रतिसाद दिल्यास करोना साखळी तोडण्यात यशस्वी होऊ असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी म्हटले आहे. तसेच, नागरिकांनी इथून पुढेही असाच प्रतिसाद द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 8:03 pm

Web Title: mini lockdown in pimpri chinchwad response from traders and citizens msr 87 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुण्यात गिरीश बापट पोलिसांच्या ताब्यात, ‘मिनी लॉकडाउन’च्या पहिल्याच दिवशी भाजपाचं आंदोलन
2 पुण्यातील हृदयद्रावक घटना, अपघातात अवघं कुटुंब झालं उद्ध्वस्त; आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत
3 पुण्यात करोनामुळे आणखी एका अधिकाऱ्याचा अकाली मृत्यू
Just Now!
X