News Flash

पिंपरीत रेल्वेच्या धडकेत आईसह दोन मुलांचा मृत्यू

मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही

पिंपरीत रेल्वेच्या धडकेत आईसह दोन मुलांचा मृत्यू

रेल्वे अपघातात आईसह दोन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. कोल्हापूर-मुंबई एक्स्प्रेसने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

अपघातात मृत पावलेल्या महिलेचे वय ३५ असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. या महिलेसह तिचा १० वर्षांचा मुलगा आणि १२ वर्षांच्या मुलीचाही या अपघातात मृत्यू झाला. दोन मुलांसोबत रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक कोल्हापूर-मुंबई एक्स्प्रेस आल्याने महिलेचा गोंधळ उडाल्याने हा अपघात झाला. अपघातातील तिघांच्या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 7:39 pm

Web Title: mother died with her two childrens while crossing railway track in pimpari
Next Stories
1 पवना नदीत बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
2 देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांचा अभिमान वाटतो – सुभाष भामरे
3 गोरक्षेच्या नावाखाली धांगडधिंगा!
Just Now!
X