करोनानं डोकं वर काढलेल्या पुण्यात प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्रेक झाल्यानंतर नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला असून, रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंतची संचारबंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २८ फेब्रुवारीपर्यंत हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णय पुन्हा वाढवण्यात आला असून, पुणे शहारातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून याची माहिती दिली. “शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच ठेवणार! पुणे महानगरपालिका हद्दीत करोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग १४ मार्च २०२१ पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल,” अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

“रात्री ११ ते सकाळी ६ संचार निर्बंध कायम ! रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत पुणे महानगरपालिका हद्दीत संचार निर्बंध कायम ठेवण्यात आली असून अत्यावश्यक सेवा, शिफ्टमध्ये कामकाज करणाऱ्यांना यात मुभा देण्यात येत आहे. तर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई सुरु राहणार आहे,” असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

राज्यातील शहरांबरोबर पुण्यातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक घेत, नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला होता. २८ फेब्रवारीपर्यंत हा निर्णय लागू करण्यात आला होता. त्याला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Night curfew extend in pune mayor murlidhar mohol tweet bmh
First published on: 28-02-2021 at 13:19 IST