पुणे शहरात रविवार आणि बुधवारी या दोन दिवशी शाहीर अमर शेख चौक ते कुंभार वेस पर्यंत जुना बाजार भरला जातो. या दोन दिवशी वाहतुक कोंडी होत असल्याने उद्या पासून महिनाभर प्रायोगिक तत्वावर जुना बाजार भरविता येणार नाही. अशा स्वरुपाचे परिपत्रक पोलीस सह आयुक्त राजेंद्र शिसवे यांनी आज काढले आहे.

पुणे शहरातील शाहीर अमर शेख चौक ते कुंभार वेस पर्यंत मागील कित्येक वर्षीपासून रविवारी आणि बुधवारी जुना बाजार भरला जातो. या बाजारात साधारण २०० हून विक्रेते आहेत. तर या ठिकाणी खरेदी करिता ग्राहक मोठ्या प्रमाणावर येत असतात. रविवारी आणि बुधवारी या दोन दिवशी त्या परिसरातून जाताना वाहन चालकांना वाहतुक कोंडीचा फटका नेहमीच बसतो. या बाबत नागरिकांच्या पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुढील महिनाभर रस्त्यावर जुना बाजार भरविता येणार नाही. अशा स्वरुपाचे परिपत्रक पोलीस सह आयुक्त राजेंद्र शिसवे यांनी आज काढले आहे. या परिपत्रकानंतर आता तेथील कित्येक वर्षापासुन व्यवसाय करणार्‍या विक्रेत्याच्या व्यवसाय परिणाम पडणार असल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.