24 November 2020

News Flash

अमेरिकन डॉलरऐवजी कागदाचे तुकडे!

एका व्यावसायिकाने याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अमेरिकन डॉलर स्वस्तात देण्याच्या आमिषाने शहराच्या मध्यभागातील एका व्यावसायिकाला गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. अमेरिकन डॉलर ऐवजी कागदाचे तुकडे देऊन व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली.

एका व्यावसायिकाने याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारादाराचे बुधवार पेठ भागात दुकान आहे. पाच ते सहा दिवसांपूर्वी दोन जण त्यांच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरले. त्या वेळी दोघांनी व्यावसायिकाला अमेरिकन डॉलर दाखविले. ‘आमच्याकडे २० डॉलरच्या ५०० नोटा आहेत. अमेरिकन डॉलर स्वस्तात देतो,’असे आमिष व्यावसायिकाला दाखविण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 1:14 am

Web Title: paper pieces instead of us dollars
Next Stories
1 इंद्रायणी नदीत आढळले हजारो मृत मासे
2 राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी
3 कचरा वेचक महिलेची मुलगी दहावीत उत्तीर्ण; आठ वर्षांपूर्वी वडिलांचं झालं निधन
Just Now!
X