News Flash

पिंपरी-चिंचवड : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून केला खून!

आरोपीला ऑन द स्पॉट अटक; घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी येथे आईवरून शिवीगाळ केल्याने एका मद्यपीने दुसऱ्या मद्यपीचा भर रस्त्यात दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली आहे. अनिल शिंदे (वय- ५०) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून यश गोपी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला घटनास्थळावरून पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ४ वाजेच्या सुमारास दापोडीत भर वस्तीमधून एकमेकांची तोंड ओळख असलेला आरोपी यश आणि अनिल हे जात होते, तेव्हा दोघांनी मद्यपान केले होते. दरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि अनिल शिंदे याने यशला आईवरून शिवीगाळ केली. आईवरून शिवीगाळ केल्याने यशला प्रचंड राग अनावर झाला व त्याने संतपाच्या भरात रस्त्यावर पडलेला दगड अनिलच्या डोक्यात घालत, त्याचा दगडाने ठेचून खून केला. दरम्यान, हे थरकाप उडवणारे दृश्य घटनास्थळी उपस्थित सर्वसामान्य नागरीक पहात होते. मात्र यशला अडवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. घटनास्थळी केवळ बघ्यांची गर्दी जमली होती.

दरम्यान, या घटनेची माहिती भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांना फोन करून देण्यात आली व त्यांना बोलावण्यात आले. ते त्याच परिसरात असल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी यश हा अनिलला दगडाने ठेचून मारत असताना ताब्यात घेतलं. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेत अनिलचा मृत्यू झाला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करत असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 8:40 pm

Web Title: pimpri chinchwad murder in the streets due to anger over abusive language msr 87 kjp 91
Next Stories
1 संभाजीराजेंनी राजीनामा दिल्यास कुणावर परिणाम होणार आहे? -चंद्रकांत पाटील
2 पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द; रिझर्व्ह बँकेकडून कारवाई
3 कर्नाटक आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात
Just Now!
X