News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन वर्षीय चिमुकली खेळत असताना पाण्याच्या हौदात पडल्याने मृत्यू

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरीमध्ये दोन वर्षांची चिमुकली खेळत असताना पाण्याच्या हौदात पडल्याने बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वेदिका राजू मुळूक वय- २ वर्ष असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. तीचे कुटुंबीय भोसरीमध्ये विवाह सोहळ्यासाठी आलं असता ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत वेदिकाचे कुटुंब पूर्वी राहात असलेल्या घरमालकाच्या मुलाचा विवाह सोहळा गुरुवारी असल्याने आई वडील आणि भावासह ती भोसरीमध्ये आली होती. घराच्या पाठीमागे जमिनीलगत पाण्याचा हौद आहे. त्या ठिकाणी ती एकटीच खेळत असताना हौदात पडली. बराच वेळ ती दिसत नसल्याने तिचा शोध आई वडिलांसह सर्व जण घेत होते. तेव्हा, पाण्याच्या हौदात पडली असल्याचा संशय आल्याने तिथे पाहिले असता तिचा मृतदेह हौदात दिसला. तिला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. परंतु त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता असं डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांना सांगितले असल्याचे माहिती पोलीस कर्मचारी बबन मोरे यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 11:13 pm

Web Title: pimpri chinchwad two year old died after falling into a pool of water while playing abn 97 kjp 91
Next Stories
1 भाजपच्या नेत्यांनी आग लावण्याची कामं करू नये : सचिन सावंत
2 Coronavirus : पुण्यात दिवसभरात १७ मृत्यू , २८८ नवे रुग्ण
3 राजू शेट्टी पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात दाखल
Just Now!
X