News Flash

वादळी पावसाची शक्यता

सध्या मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

वादळी पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी

पुणे : राज्याच्या सर्वच विभागांत तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता कायम आहे. रविवारी मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

सध्या मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. हा पट्टा उत्तर अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीमा मार्गे जातो. सलग दुसऱ्या दिवशी हा पट्टा कायम असून, त्याचाच परिणाम म्हणून राज्यात विविध ठिकाणी पुढील चार दिवस पावसाळी स्थिती कायम राहणार आहे. विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी सध्या अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होत असल्याने कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात तापमानातील वाढ कायम आहे. रविवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात दोन तास जोरदार पावसाने हजेरी लावली.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात हलका पाऊस होईल. काही भागांत सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा आहे. कोकण विभागातही तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 1:14 am

Web Title: presence of rains in sparse places in central maharashtra akp 94
Next Stories
1 लशींसाठी जागतिक निविदा!
2 राज्यात काही ठिकाणी  वादळी पावसाचा इशारा
3 राज्यातील कृषी पदव्यांना ‘बीएस्सी अ‍ॅग्रि’ समकक्षतेचा दर्जा
Just Now!
X