12 August 2020

News Flash

पुण्यात ‘करोना’वरील प्रतिबंधात्मक लस विकसित!

सध्या केवळ प्राथमिक स्तरावरील वैद्यकीय चाचण्यांसाठी उपलब्ध, सहा महिन्यानंतर रुग्णावर प्रत्यक्ष चाचणी

चीनमध्ये सध्या जीवघेण्या ‘करोना’ विषाणूचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव झाला आहे. आतापर्यंत यामुळं हजारो नागरिकांचे बळी देखील गेले आहेत. शिवाय, करोनाचं जीवघेणं जाळं दिवसेंदिवस जगभर पसरत असल्याने, सर्वत्र चिंतेचं वातावरण देखील जाणवत आहे. अनेक देशातील शास्त्रज्ञ सध्या यावर उपाय शोधण्यासाठी संशोधन करत असताना, पुण्यात मात्र या जीवघेण्या विषाणूला रोखण्यासाठी लस विकसित करण्यात यश आलं आहे.

येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ही कामगिरी केली आहे. अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीनं ही लस विकसित केली गेली असल्याची माहिती समोर आली आहे. ही भारताची पहिली लस असेल जी एवढ्या वेगानं या स्तरापर्यंत विकसित करण्यात यश आलं आहे. असं सांगितलं जात आहे.

सध्या ही लस प्राथमिक स्तरावरील वैद्यकीय चाचण्यांसाठी उपलब्ध आहे. सहा महिन्यानंतर एखाद्या रुग्णावर तिची चाचणी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ही लस सुरक्षाकवच असल्याचा देखील दावा केला गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 7:37 pm

Web Title: preventive vaccine on corona developed in pune msr 87
Next Stories
1 “एल्गार परिषदेत घेण्यात आली भाजपा, RSS विरोधी शपथ”
2 हिंजवडीत कंपनीला लागली भीषण आग; १०० जण थोडक्यात बचावले
3 कानशिलात लगावल्याने चाकणमध्ये दगडाने ठेचून केली हत्या
Just Now!
X