News Flash

Video: तोंडातच फुटली मोबाईलची बॅटरी; CCTV त कैद झाला थरार

पिंपरी मोबाईल मार्केटमधील धक्कादायक प्रकार

पुण्यामधील पिंपरी-चिंचवड येथे एक अजब अपघात घडला आहे. येथील पिंपरी मोबाईल मार्केटमधील एका दुकानामध्ये मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला आहे. धक्कादायक बाबमध्ये दुकानातील एका कर्मचाऱ्याने तोंडात मोबाईलची बॅटरी पकडली असतनाच ती फुटल्याने एकच गोंधळ उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार ‘श्री रूपम मोबाईल शॉपी’मधील कर्मचारी एका ग्राहकाच्या मोबाईलची बॅटरी चेक करत होता. तोंडामध्ये बॅटरी टाकून ती दाबण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक या बॅटरीचा स्फोट झाला. यामध्ये एकजण जखमी झाला असून त्याच्या तोंडाला जखम झाली आहे.

स्फोट झाल्यानंतर दुकानातील इतर कर्मचारी आणि दुकानाबाहेरील ग्राहक गोंधळले आणि इकडे तिकडे धावू लागल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 11:16 am

Web Title: pune mobile battery blast in pimpri chinchvad scsg 91
Next Stories
1 लंडनमधील २६ वर्षीय तरुणी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत, जाहीर केली उमेदवारी
2 गांगुलीवर संतापले क्रिकेट चाहते; यश महिला संघाचे, कौतुक जय शाहांचे
3 असं काय घडलं की तुकाराम मुंढे इतकं खळखळून हसले?
Just Now!
X