News Flash

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानीचा २९ रोजी पुण्यात मोर्चा: राजू शेट्टी

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ पुण्यातील अलका चौक ते साखर संकुलवर मोर्चा काढणार.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानीचा २९ रोजी पुण्यात मोर्चा: राजू शेट्टी
राजू शेट्टी

राज्यातील ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी येत्या २९ जूनला पुण्यातील अलका चौक ते साखर संकुलवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात दिली.

राजू शेट्टी म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले असून त्याच्या निषेधार्थ २९ जून रोजी पुण्यात मोर्चा काढला जाणार आहे. त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखानदारांनी अद्यापही एफआरपी दिली नाही. ती त्वरित द्यावी किंवा साखर आयुक्तांनी कारखान्याच्या मालकीची मालमत्ता जप्त करावी. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट असून दुधाचे दर घसरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या सरकारने लिटर मागे पाच रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2018 5:28 pm

Web Title: rally for farmers problem in pune on 29 th june says rajy shetty
टॅग : Raju Shetty
Next Stories
1 आमचा पेशवाईला विरोध त्यामुळे पगडीलाही विरोधच – प्रकाश आंबेडकर
2 डीएसकेप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांसह सहा जणांना अटक
3 जुन्या बंगल्यांमध्ये हॉटेल सुरू करण्याचा नवा कल