News Flash

पुणेकरांना दिलासा देणारी बातमी : ४ तासात मिळणार RT PCR अहवाल; घराजवळच करता येणार Covid चाचणी

शनिवारपासून ही मोहीम सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आलीय

प्रतिनिधिक फोटो (मूळ फोटो पीटीआयवरुन साभार)

महाराष्ट्रासहीत देशभरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या अगदी झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखांहून अधिक रुग्ण देशात आढळून आले आहेत. देशभरामध्ये करोना चाचण्यांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र आरटीपीसीआर तसेच अँटिजेन चाचणी (प्रतिजन चाचणी) करण्याचं प्रमाण वाढल्याने तपासणी केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी रुग्णसंख्या, चाचण्यांची संख्या वाढल्याने सामान्यपणे ४८ तासांमध्ये मिळणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्यांचा निकाल मिळण्यासाठी ७२ तासांहून अधिक अवधी लागत आहे. या अधिक अवधीसंदर्भात अगदी राजकारण्यांनीही चिंता व्यक्त केली आहे.

करोना चाचण्यांचा निकाल कमीत कमी कालावधीमध्ये उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील सूचना यापूर्वीही अनेकदा देण्यात आल्या आहेत. मात्र मर्यादित यंत्रणा आणि इतर तांत्रिक कारणांमुळे आरटीपीसीआरचा निकाल मिळण्यासाठीचा आवधी कमी होताना दिसत नाहीय. असं असतानाच पुण्यामध्ये मात्र शनिवारपासून अवघ्या चार तासांमध्ये आरटीपीसीआर चाचणीचे निकाल मिळणारी एक अनोखी चालती फिरती प्रयोग शाळा सुरु होणार असल्याची माहिती कोथरुडचे आमदार आणि महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

“एक युनिक उपक्रमाचे उद्या संध्याकाळी उद्घाटन केलं जाणार आहे,” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी या चालत्या फिरत्या प्रयोगशाळेची घोषणा केली. क्रिकेटपटू हरभजन सिंगने पुण्यामध्ये चालत्या फिरत्या करोना प्रयोगशाळांसाठी मदत देऊ केली आहे. यासंदर्भातील निर्णयावर आज शिक्कामोर्बत होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. ही चालती फिरती प्रयोगशाळा दिवसभरामध्ये पुणे शहर आणि परिसरातील वेगवेगळ्या भागांमध्ये फिरणार आहे. काही ठिकाणी चाचण्या करण्यासाठी लोकं घाबरत आहेत. अशा परिसरांमध्ये जाऊन माईकवरुन या प्रयोगशाळेसंदर्भात माहिती दिली जाईल आणि तेथील नागरिकांच्या चाचण्या केल्या जातील, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. वडगाव शेरी येथून या उपक्रमाला सुरुवात होणार असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. या चालत्या फिरत्या प्रयोगशाळांमधून अवघ्या चार तासांमध्ये पुणेकरांना आरटीपीसीआर अहवाल मिळणार आहेत.

या प्रयोगशाळेची क्षमता दिवसाला दीड हजार चाचण्या करण्याइतकी आहे. ५०० रुपयांमध्ये या चाचण्या करुन दिल्या जातील कर काहींना त्या मोफत करुन दिल्या जातील, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 3:41 pm

Web Title: rt pcr test result will be available in 4 hours with help of moving testing lab says chandrakant patil svk 88 scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ३५० कोटी रुपये पोत्यात भरुन अजितदादांच्या टेबलवर टेकवा आणि म्हणा… : चंद्रकांत पाटील
2 Remdesivir : “महाराष्ट्राला २ लाख ६९ हजार इंजेक्शन मिळाली तर ज्या गुजरातच्या नावाने आरडाओरड होतोय त्यांना…”
3 Coronavirus : “…तर ६० दिवसात संपूर्ण पुण्याचं लसीकरण पूर्ण करु”
Just Now!
X