पोलीस आणि डॉक्टरांवर हल्ले होतात तसे हल्लीच्या काळात विद्यार्थ्यांवर सोशल मीडियाचे आक्रमण होते आहे अशी खंत पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी बोलून दाखवली. इंडियन डेन्टल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य डेन्टल असोसिएशनची ५६ वी परिषद पिंपरीमध्ये पार पडली. याच कार्यक्रमात ते बोलत होते.

कॉलेज आयुष्यात स्वच्छंदी असणे, मजा करणे यात काहीही गैर नाही. मात्र ही मजा कशा पद्धतीने करायची आणि किती वेळ करायची याचाला मर्यादा हव्यात. अलिकडच्या काळात विद्यार्थ्यांवर सोशल मीडियाचे आक्रमण होते आहे. तरूण पिढी या सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे.

एक १२ वर्षांचा मुलगा इंटरनेटद्वारे रात्रभर अभ्यास करायचा. याचा त्याच्या वडिलांनाही अभिमान वाटत असे. मात्र रात्रभर अभ्यास केल्याने त्याला वेळेचे भान राहात नव्हते या संदर्भातला लेख नुकताच वाचला असेही त्यांनी म्हटले. तसेच सोशल मीडिया हा एका ठराविक मर्यादेपर्यंत चांगला आहे नंतर मुलांमध्ये विकृती वाढीला लागते ही बाब चांगली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.