06 August 2020

News Flash

महाविकास आघाडीतील ‘तो’ अंतर्गत प्रश्न : सुप्रिया सुळे

आमचं सरकार दडपशाहीचे नसल्याचे सांगत, केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे साधला निशाणा!

अहमदनगर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश, हा महाविकास आघाडीतील अंतर्गत प्रश्न असल्याचे आज  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज पुण्यात मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारली,यावर त्या बोलत होत्या.

अहमदनगर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशावरून सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर भूमिका स्पष्ट केली.

राज्य सरकाराच्या कामावर विरोधक टीका करीत असल्याच्या प्रश्नावर खासदार सुळे म्हणाल्या की, सध्या जगावर करोनाच संकट असून आपल्या राज्यावर देखील संकट आहे. या काळात राज्य सरकार चांगले काम करत आहे. मात्र विरोधक टीका करण्याचे काम करत आहे. त्यांनी त्यांचे काम करावे आणि आम्ही आमचे काम करत राहणार आहोत. मात्र आमचं सरकार दडपशाहीचे नसल्याचे सांगून, अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवर त्यांनी निशाणा साधल्याचेही यावेळी दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 6:41 pm

Web Title: that mahavikas aghadis internal question supriya sule msr 87 svk 88
Next Stories
1 लॉकडाउनचा सगळ्या व्यवसायांवर गंभीर परिणाम-शरद पवार
2 पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांना करोनाची लागण
3 करोनावर लस येण्यासाठी किमान सहा महिने लागणार-अदर पूनावाला
Just Now!
X