सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावाने समजमाध्यमवर बनावट माहिती पाठवून सीरम इन्स्टिट्यूटला तब्बल १ कोटी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ७ ते ८ सप्टेंबर दरम्यान घडला आहे.याबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे वित्तीय अधिकारी सागर कित्तुर (वय ४४, रा. कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कित्तुर हे सीरम इन्स्टिट्यूटमध्ये वित्तीय व्यवस्थापक आहेत़ तर सतीश देशपांडे हे कंपनीचे संचालक आहेत़ .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पुणे : विसर्जन मिरवणुकीत अनेकाचे मोबाइल संच गहाळ

आदर पूनावाला हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून त्यांच्या नावे बनावट संदेश देशपांडे यांना पाठविण्यात आले़. त्यात काही बँक खात्यांचे तपशील देऊन त्यावर तात्काळ पैसे पाठविण्यास सांगितले.

संदेश खरे वाटल्याने कंपनीच्या खात्यावरुन विविध बँक खात्यावर एकूण १ कोटी १ लाख १ हजार ५५४ रुपये पाठविण्यात आले. त्यानंतर कंपनीची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली असून पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 crore fraud of serum institute in the name of aadar poonawala in pune print news tmb 01
First published on: 10-09-2022 at 13:25 IST