scorecardresearch

पुण्यात पीएमपी चालकासह वाहकाला तिघांकडून मारहाण, गुन्हा दाखल

पुण्यातील कोंढवा परिसरात पीएमपी चालकासह वाहकाला तीन जणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

प्रातिनिधीक फोटो

पुण्यातील कोंढवा परिसरात पीएमपी चालकासह वाहकाला तीन जणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींची मोटार पीएमपी बसला घासून गेल्यानंतर आरोपींनी चालक आणि वाहकाला शिवीगाळ केली. हा वाद वाढत गेल्यानंतर आरोपींनी चालकासह वाहकाला मारहाण केली आहे. यानंतर आरोपी आपल्या कारमधून पसार झाले. या प्रकरणी तिघांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पीएमपी चालक संदीप लोंढे (रा. माळवाडी, हडपसर) यांनी याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीएमपी चालक लोंढे कोंढवा परिसरातील सोमजी चौकातून जात होते. त्यावेळी आरोपींची मोटार पीएमपी बसला घासून गेली. या कारणावरुन मोटारीतील तिघांनी पीएमपी चालक लोंढे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

आरोपींनी पीएमपी बस भररस्त्यात थांबवली आणि पीएमपी चालक लोंढे आणि वाहकाला शिवीगाळ करत मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आरोपींनी मोटारीतून काढला. या धक्कादायक प्रकारानंतर पीएमपी चालक लोंढे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 3 accused beat pmp bus driver and conductor in kondhava pune print news rmm

ताज्या बातम्या