पुणे: मुलांना इतिहास, कला, साहित्य, वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे यांच्यातर्फे २२ ते २५ मे या कालावधीत बालपुस्तक जत्रा आयोजित करण्यात आली आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या या कार्यक्रमात पुस्तक, खाऊच्या दालनांसह विविध उपक्रम, कार्यशाळा, परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत.

पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संवाद पुणेचे सुनील महाजन, पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे राजेश कामठे या वेळी उपस्थित होते. बालपुस्तक जत्रा अंतर्गत मराठी पुस्तकांचे पुस्तक प्रदर्शन, किशोर मासिकाच्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन, बालसाहित्य लेखन स्पर्धा, मुलांचे कविसंमेलन, जादूचे खेळ आणि प्रशिक्षण, पपेट शो, शिका विमान विज्ञान, खेळा अंगणातले खेळ असे उपक्रम होणार आहेत.

पांडे म्हणाले, ‘पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद लाभतो. मात्र, सध्याच्या उन्हाळी सुटीमध्ये मुलांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम करण्याची कल्पना पुढे आली. मुलांना साहित्य, संस्कृतीची माहिती करून देण्याचा, भविष्यात मुलांमधून चांगले वाचक घडवण्याचा उद्देश आहे. त्यामुळे मुलांच्या भावविश्वाशी संबंधित उपक्रम या जत्रेमध्ये होणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेगवेगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.पुस्तक प्रदर्शनात मुलांसाठीची असंख्य पुस्तके असतील. विमान, वैज्ञानिक खेळणी तयार करण्यासारखी कार्यशाळा, पपेट शो, जादूचे खेळ होणार असल्याने मुले त्यात रमतील. त्याशिवाय खाऊचीही दालने असतील. ही जत्रा संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी अनुभव ठरेल, असे महाजन यांनी सांगितले.