लोणावळा: मुंबई-पुणे महामार्गावर पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर असलेल्या दोन चिक्की विक्री दुकानात ट्रक शिरल्याची घटना शनिवारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. ट्रकच्या धडकेत दाेन वाहनांचे नुकसान झाले.

याप्रकरणी ट्रकचालक सहदेव नाथा सूर्यवंशी (वय ४८, सध्या रा. नवी मुंबई, मूळ रा. माजलगाव, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दिवसा जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ट्रकचालक सूर्यवंशी सकाळी साडेअकराच्या सुमारास खंडाळ्याकडे निघाला होता. पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर वळणावर ट्रकचालकाचा ताबा सुटला. ट्रक चिक्की विक्री करणाऱ्या दुकानात शिरला. प्रसंगावधान राखून ट्रकचालकाने ब्रेक दाबल्याने अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणाला गंभीर दुखापत झाली नाही.

हेही वाचा… पुणे – सोलापूर महामार्गावर ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुकानात शिरलेला ट्रक मागे घेण्यात येत होता. त्यावेळी ट्रकने एक मोटार आणि दुचाकीला धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रकचालक सूर्यवंशीला ताब्यात घेतले.