पुणे : सदाशिव पेठेत पेरुगेट चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करून पसार झालेल्या हल्लेखोर तरूणाला नागरिकांनी पाठलाग करून पकडले. पोलीसांनी आरोपी शंतनु लक्ष्मण जाधव वय २२ रा मुळशी डोंगरगाव याला ताब्यात घेतले आहे. आरोपी जाधव याने केलेल्या हल्ल्यात तरूणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वीस वर्षीय तरुणी कोथरूड येथील सुतरदारा भागात राहायला आहे. आरोपी शंतनु जाधव तरूणीवर एकतर्फी प्रेम करत होता. तिचा पाठलाग करून त्रास देत होता. त्याने सदाशिव पेठेत पावन मारुती मंदिराजवळ सकाळी तरुणीला गाठले. तरुणीला अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला झिडकारले. तेव्हा त्याने तिच्यावर कोयत्याने वार केले. आरोपी जाधव पसारा झाला . नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले. अप्पा बळवंत चौकात त्याला चोप दिला.

हेही वाचा >>> सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणाच्या तत्परतेमुळे तरूणी बचावली

आरोपी शंतनु जाधवने तरूणीवर भर रस्त्यात कोयता उगारला आणि तिच्यावर हल्ला केला. त्या वेळीं तेथून अभ्यासिकेत एक तरूण निघाला होता. त्याने हा प्रकार पाहिला आणि आरोपी जाधवला प्रतिकार केला. तरुणाने प्रतिकार केल्याने जाधव घाबरला आणि तो पळाला. नागरिकांनी पाठलाग करून त्याला अप्पा बळवंत चौक परिसरात पकडले