पुणे : भरधाव टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत पादचारी तरुण ठार झाला. त्याची ओळख पटली नसून, आंबेगाव पोलिसांनी आरोपी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (११ जून) जूनला सकाळी सहाच्या सुमारास कात्रजमधील मौर्य हॉटेलसमोर हा अपघात घडला. पोलीस अंमलदार दत्तात्रय मेंगाळ यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत टेम्पो चालकाने बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास पादचारी तरुणाला धडक दिली. संबंधित तरुणाची ओळख पटली नसून, अपघातात गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीराज थोरात तपास करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ११ जून रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास भरधाव ट्रकचालकाने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार सहप्रवाशी महिला जागीच ठार झाल्याची घटना मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकात घडली. त्यामुळे बेशिस्त आणि बेदरकार वाहन चालकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.