लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाच्या दोन परवाना निरीक्षकांना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली.

sassoon hospital marathi news
ऑपरेशन ‘ससून’! अधिष्ठात्यांना डावलून थेट आयुक्तांनी हाती घेतली सूत्रे
vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

परवाना निरीक्षक राजेश बांदल, सुभाष मळेकर या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, वैद्यकीय कारणास्तव रजेवर गेलेले परवाना निरीक्षक राजेंद्र चौधरी यांना कामावर तत्काळ हजर होण्याचे आदेश सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिले आहेत.

हेही वाचा… पुणे: ‘नदीसुधार’च्या कामांचा देखावा; जी-२० परिषदेच्या निमित्ताने कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ

किवळे येथील अनधिकृत लोखंडी जाहिरातफलक कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना एप्रिलमध्ये घडली होती. या घटनेनंतर आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील सर्व अनधिकृत फलकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. या सर्वेक्षणात तब्बल ९२ नवीन बेकायदा जाहिरातफलक आढळून आले. त्यानंतर या फलकांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले होते.

हेही वाचा… छत्रपती संभाजीराजे म्हणाले…पारंपरिक शिवराज्याभिषेक सोहळ्यात ‘नाटकीपणा’ नको!

आयुक्तांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी अनधिकृत फलक आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या ज्या जाहिरात फलकाची स्थापत्यविषयक स्थिरता (स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी) महापालिकेकडे आलेली नाही, अशा फलकांवर कारवाईचे आदेश दिले. मात्र परवाना निरीक्षक मळेकर आणि बांदल यांनी फलकावर कारवाई केली नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस त्यांना बजावण्यात आली.