वारंवार सूचना देऊनही कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया गतिमान करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. स्वच्छता मोहिमेत हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: विद्यापीठाच्या भोजनगृहातील भोजनाची दरवाढ ;विद्यापीठाचा निर्णय, १ जानेवारीपासून अंमलबजावणी

पिंपरी पालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छता आणि कचऱ्याचे विलगीकरण करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते,  तेव्हा ते बोलत होते. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास उपायुक्त अजय चारठाणकर, स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक विनोद जळक, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, शितल वाकडे, विजयकुमार थोरात आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>>“स्मशानभूमीत येईन, पण शहर कार्यालयात येणार नाही”, मनसेच्या वसंत मोरे यांनी ठणकावलं; म्हणाले “जिथे फुलं वेचली…”

वाघ म्हणाले की, कचरा विलगीकरण करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. तरीही काही नागरिक कचरा विलगीकरणबाबतच्या सूचनांचे पालन करत नाहीत. नागरिकांनी प्रत्यक्ष कचरा विलगीकरण करण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांची नोंद करून घ्यावी.यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना स्वच्छ सर्वेक्षण क्षमता बांधणी तज्ज्ञ बलजित सिंघ आणि मेट्रिक्स ह्युमन सेक्युरिटी संस्थेचे गोविंद माधव यांनी प्रशिक्षण दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Additional commissioner jitendra wagh orders punitive action against citizens who do not segregate waste pune print news bej 15 amy
First published on: 09-12-2022 at 18:16 IST