पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यानंतर पाटील यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन बाबरी मशीद पतनातील शिवसेनेच्या सहभागाबद्दल स्पष्टोक्ती केली. बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात आदर आहे. त्यांचा अनादर करण्याचे पाप मी करणार नाही, अशी पुस्तीही पाटील यांनी या वेळी जोडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाबरी पतनातील शिवसेनेच्या सहभागाबाबत सोमवारी भाष्य केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटील यांच्यावर सडकून टीका केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पाटील यांच्या वक्तव्याशी पक्ष सहमत नसून ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील यांना दूरध्वनी करून तातडीने खुलासा करण्याबाबत बजावले. त्यानंतर पाटील यांनी पुण्यातील निवासस्थानी तातडीने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.

हेही वाचा… बाबरीसंदर्भातली चंद्रकांत पाटलांची भूमिका व्यक्तिगत, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी स्पष्ट केली भाजपाची भूमिका, म्हणाले…

पाटील म्हणाले, मी साधा सरळ माणूस असून गरिबीतून आलो आहे. मी मुंबईकर असल्याने बाळासाहेबांचे मराठी माणसावर असलेले ऋण मी जाणतो. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मी मुंबईकर असल्याने आदरच आहे. बाळासाहेबांचा अनादर होईल असे माझ्या तोंडून काहीच निघणार नाही. संजय राऊत वारंवार बोलत असतात पण बाबरी पाडताना कुठे होते? असा पुन्हा सवाल उपस्थित करत हाच मुद्दा माझा होता. मुलाखतीत मी बाळासाहेबांबद्दल आदर व्यक्त केला आहेच. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. पत्रकार परिषद घेत सांगा की, बाळासाहेबांद्दल अनादर नाही. म्हणून हा खुलासा करत आहे.

हेही वाचा… “आता हे स्वतःच जोड्यानं आपलं थोबाड फोडून घेणार आहेत का?”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

बाबरीचा ढाचा पडताना विश्व हिंदू परिषदेच्या नेत्तृत्त्वात सगळे हिंदू होते. शिवसैनिक वगैरे भेद नव्हता. कुठल्या एका पक्षाने बाबरी पाडलेली नाही. उद्धव ठाकरे आणि माझे संबंध चांगले आहेत. त्यांच्याशी बोलून त्यांना माझी भूमिका सांगेन, असेही पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा… बाळासाहेब ठाकरेंचा बाबरी पाडण्याशी संबंध नाही? चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून वाद; संजय राऊतांचं टीकास्र!

कोण जयंत पाटील?

या विषयावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इतकी वर्षे चंद्रकांत पाटील कुठे होते? त्यांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा?, अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर उत्तर देताना कोण जयंत पाटील? ज्यांनी रामाचे नाव घेतल्यानंतर पाल पडल्यासारखे केले, ते आम्हाला रामाबद्दल काय शिकवणार, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After cm eknath shindes phone call chandrakant patil is at backfoot on balasaheb thackeray and babri masjid statement pune print news psg 17 asj
First published on: 11-04-2023 at 18:18 IST