पुणे : पुणे शहरातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केटमधील लाकूड साहित्याचे सात आठ गोडाऊन आणि चार घरे जळून खाक झाली आहेत. त्या सर्वांना प्रशासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना दिले आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “माझी आतल्या गोटातली माहिती आहे की…”, अजित पवारांचं लोकसभा निवडणुकीबाबत मोठं विधान; म्हणाले, “मला वाटत होतं…!”

अजित पवार म्हणाले की, पुण्यातील टिंबर मार्केट लाकूड साहित्य खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सतत वर्दळ असते. त्या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी येथील मार्केट दुसर्‍या ठिकाणी करण्याचे नियोजन होते. मात्र ते काही कारणास्तव होऊ शकले नाही. पण आता येथील लोकांनी कुठे जागा असल्यास त्याबाबत सांगावे. त्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. तसेच या आग लागलेल्या घटनेमध्ये कोणीही राजकारण आणू नये. येथील व्यापाऱ्यांनी घातपाताची शक्यता वर्तविली आहे. त्या दृष्टीनेदेखील पोलिसांनी तपास करावा आणि या सर्वांचा व्यवसाय, घरे कशी उभी राहतील यासाठी विशेष सर्व प्रयत्न झाले पाहिजे, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar instructed the administration to help the victims in pune timber market svk 88 ssb
First published on: 27-05-2023 at 10:26 IST